पाणीदार 'सालईबन'साठी महाराष्ट्र दिनी महाश्रमदान

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 मे 2018

खामगाव येथून ६० जलमित्र तर इतर ठिकाणावरून २५ जण यात सहभागी झाले. ३ तासाच्या श्रमदानातून तब्बल २०० मिटर लांबीचे सलग समतल चर खोदल्या गेले. 

संग्रामपूर (बुलढाणा) - १ मे महाराष्ट्र दिनी जळगाव जामोद तालुक्यातील चालठाणा गावाजवळील सालईबन येथे उत्साहात महाश्रमदान झाले. खामगाव येथून ६० जलमित्र तर इतर ठिकाणावरून २५ जण यात सहभागी झाले. ३ तासाच्या श्रमदानातून तब्बल २०० मिटर लांबीचे सलग समतल चर खोदल्या गेले. 

संपूर्ण महाराष्ट्रातील ४ हजार गावांनी दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जायते वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतला आहे. ४५ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत गावकरी रोज श्रमदान करून जलसंधारणाची कामे करत आहेत. याच अनुषंगाने तरुणाई फाउंडेशच्या कार्यकर्त्यांनी १ मे रोजी सालईबन येथे जाऊन महाश्रमदान केले. यापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला सिंदखेड लपाली (ता. मोताळा) येथे तरुणाई टीम ने श्रमदान केले होते. 

Sangrampur

सालईबन येथे सकाळी ६ वाजता मोठ्या उत्साहात खामगाव येथून सहपरिवार आलेल्या जलमित्रांनी श्रमदानाला सुरुवात करून २०० मिटर लांब सीसीटी खोदले. यावर्षीच्या पावसाळ्यात सुमारे साडे ३ लाख लिटर पाणी या चरांमध्ये जमा होऊन जमिनीत मुरणार आहे. फक्त ३ तासांच्या श्रमदानातूनच हे शक्य झाले. यापुढेही २२ मे पर्यंत श्रमदानाने कार्य सुरु राहणार आहे. 

"देशाशाठी दोन हात - दोन तास" या आवाहनाला प्रतिसाद देत खामगाव येथून तरुणाईचे अनेक सदस्य तसेच योग शिक्षक राजेन्द्रसिंह राजपूत व पतंजलि परिवार, ध्रुव मार्टचे बिरजू भट्टड, हिंदुस्थान युनिलिव्हरचे कर्मचारी, वडपाणी, चाळीसटापरी येथील आदिवासी येथील बांधव सहभागी झाले होते. या श्रमदानासाठी कुदळ, फावडे आदी नवीन साहित्य तरुणाईचे पदाधिकारी तथा अमरावती विद्यापीठ रासेयो संचालक डॉ. राजेश मिरगे यांनी तर भोजन व नाश्ताची व्यवस्था तरुणाईचे पदाधिकारी सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ् डॉ. संजीव राठोड यांनी केली.

Sangrampur

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Mahashramdan on Maharashtra Din At Sangrampur