महात्मा फुलेंच्या चित्रपटाला थांबा 

महात्मा फुलेंच्या चित्रपटाला थांबा 

नागपूर - सत्यशोधक महापुरुष महात्मा जोतीराव फुले यांचे वाङ्‌मय प्रकाशित करण्याचे वचन राज्य सरकारने दिले. मात्र, महाराष्ट्र सरकारचे महात्मा फुले चरित्र साधने प्रकाशन समिती वचन पाळत नाही. महात्मा फुले साहित्य खंडाचे नवीन प्रकाशन होत नाही. त्याचधर्तीवर महात्मा फुलेंच्या जीवनसंघर्षावर निर्माण होणाऱ्या चित्रपटाचे हाल झाले आहे. चित्रपट तयार करण्यासंदर्भात सरकारने घोषणा केली; परंतु अद्याप हे काम थांबले आहे. 

15 वर्षांपूर्वी महात्मा फुले यांच्या जीवनावर चित्रपट तयार करण्याची घोषणा कॉंग्रेसनेही केली होती. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळावर जबाबदारी सोपविली होती. बाबा आढाव व महात्मा फुले यांच्या साहित्याचे गाढे अभ्यासक हरी नरके यांची समिती तयार केली होती. अडीच कोटींचा निधी महाराष्ट्र व पाच कोटींचा निधी केंद्रातर्फे मिळणार होता. परंतु, हा चित्रपट तयार झाला नाही. अलीकडे 2015 मध्ये समता फिल्मतर्फे सत्यशोधक या बायोपिकच्या निर्मिची घोषणा करण्यात आली. याचे काय झाले हे कळायला मार्ग नाही. 2017 मध्ये भाजपच्या सरकारने महात्मा फुले यांचे जीवनकार्य आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्याचा संकल्प करीत चित्रपटाची घोषणा केली. मात्र, अद्याप या चित्रपटाच्या प्रगतीचा आलेख पुढे सरकलाच नसल्याची माहिती पुढे आली आहे. 
 
महात्मा फुलेंविषयी 
महात्मा फुले यांना 63 वर्षांचे आयुष्य लाभले. यात त्यांनी केलेला संघर्ष युवा पिढीला प्रेरणादायी आहे. महात्मा फुले यांनी त्यावेळी कंपनी स्थापन केली होती. त्यांच्या कंपनीच्या पुढाकाराने कात्रजचा बोगदा, येरवड्याचा पूल व खडकवासला कालव्याचे काम केले होते. जोतीराव फुले अर्थतज्ज्ञ होते. महात्मा फुले त्या काळात शिक्षण, स्त्री-पुरुष समता, जाती निर्मूलन, आंतरजातीय विवाह आदी कार्यक्रम राबवले होता. बौद्ध विचारवंत व आद्य नाटककार "अश्‍वघोष'चे पुस्तक प्रकाशित केले होते. गुलामगिरी, शेतकऱ्यांच्या आसूडसारख्या ग्रंथातून शेतकऱ्यांसह सामान्य माणसांचे जगणे चितारले होते. "तृतीय रत्न' हे दलित नाट्य चळवळीतील पहिले नाटक असल्याचे नाटककार दादाकांत धनविजय यांनी पवनी येथील अ. भा. दलित नाट्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणातून सांगितले होते. हा संघर्ष महाराष्ट्रापुढे चित्रपटातून यावा. 

सरकारने घ्यावा ठोस निर्णय 
सैराट या प्रसिद्ध चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवनावर चित्रपटाची निर्मिती करण्यासंदर्भात सकारात्मकता दाखवली आहे. क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या चित्रपटाचे काम मंजुळे यांच्याकडे सरकारने सोपवावे. 
- दादाकांत धनविजय 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com