सहकार क्षेत्रात ‘महाविकास आघाडी’चा प्रयोग फसला

पंजाबराव ठाकरे
Monday, 20 January 2020

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्याने ह्या प्रयोगाचे लोण तालुकास्तरापर्यंत पोहोचल्याचे संग्रामपूर येथील प्रकारावरून दिसून आले.

संग्रामपूर (जि.बुलडाणा) : सहकार क्षेत्रात महाविकास आघाडीचा प्रयोग करण्याचा प्रयत्न करणारे तोंड घशी पडल्याचा प्रकार 20 जानेवारी रोजी संग्रामपूरमध्ये समोर आला आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती विरुद्ध अविश्वास दर्शक ठरावासाठी 20 जानेवारी रोजी सभा घेण्यात आली होती. मतदानाचा हक्क असलेल्या 18 संचालकापैकी 9 संचालकांनी सभा त्याग केला. 1 संचालक तटस्थ राहले. तर 8 संचालकांनी ठरावाचे विरुद्ध मतदान केल्याने भाजपच्या सभापती विरुद्धचा अविश्वास ठराव फेटाळण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहेत.

Image may contain: one or more people, people standing and outdoor
संग्रामपूर बाजार समिती

20 पैकी 18 संचालकांना मतदानाचा हक्क
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्याने ह्या प्रयोगाचे लोण तालुकास्तरापर्यंत पोहोचल्याचे संग्रामपूर येथील प्रकारावरून दिसून आले. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणून भाजपचे गजानन दाणे विराजमान आहेत. येथे एकूण 20 संचालक संख्या आहे. यापैकी 18 संचालकांना मतदानाचा हक्क आहे. यामध्ये बाजार समितीची निवडणूक गटवारीने लढलेली आहे.

बापरे! - अप्पर जिल्हाधिकारी रिव्हाॅल्व्हर रोखतात तेव्हा...

राज्यातील प्रयोग तालुक्यात
आमदार डॉ. संजय कुटे यांच्या गटाने सत्ता स्थापन केली होती. विधानसभा निवडणूक पूर्वी शिवसेना-भाजप सोबतच होती. म्हणून या ठिकाणची संख्या बळ शिवसेना-भाजपची जास्त आहे. सोबतच काँग्रेस, राष्ट्रवादी, भारिपचे ही संचालक आहेत. राज्यात सत्तास्थापनेसाठी घडलेला प्रकार पाहून महाविकास आघाडीमधील नेते तालुका ठिकाणी ही असा प्रयोग करण्याचा प्रयत्न करीत आहेत. 

क्लिक करा - नकली नोटा चलनात आणण्याच्या होते तयारीत अन् झाले जेरबंद

भाजपच्या सभापतीविरुद्ध महाविकास आघाडी
महाविकास आघाडीच्या धर्तीवर 8 जानेवारी रोजी संग्रामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गजानन शंकर दाणे यांचे विरुद्ध अविश्वास ठराव दाखल करण्यात आला. जिल्हाधिकारी यांचेकडे केलेल्या मागणीनुसार जळगाव जामोद सहाय्यक निबंधक यांचे अध्यक्षतेखाली 20 जानेवारी रोजी कृषी उत्पन्न बाजार समितच्या सभागृहात विशेष साधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. 

आमदार डॉ.संजय कुटेंचे वर्चस्व कायम
अविश्वास दर्शक ठरावाचेवेळी उपस्थित 20 संचालकांपैकी 9 संचालकांनी सभा त्याग केली. 1 संचालक तटस्थ राहले. तर 8 जणांनी अविश्वास ठरावाचे विरुद्ध मतदान केल्याने सभापती विरुद्धचा अविश्वास ठराव फेटाळण्यात आला. तीन महिन्यानंतर या बाजार समितीची मुदत संपत आहे. तो पर्यंत भाजपचे आमदार डॉ. संजय कुटे यांचे बाजार समितीवर वर्चस्व कायम राहणार हे यावरून स्पष्ट झाले आहे. यात महाविकास आघाडी मधील काही नेते मात्र तोंडघशी पडल्याची चर्चा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 'mahavikas aghadi' experiment collapsed in the field of cooperation