सत्तेसाठी ‘मविआ’त एकमत; काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना नेत्यांची बैठक

सत्ता स्थापन करण्यासाठी तिन्ही पक्षाचे नेत्यांनी एकत्र येऊन विचारमंथन केले
NCP, Shivsena
Mahavikas Aaghadi
NCP, Shivsena Mahavikas AaghadiNCP, Shivsena Mahavikas Aaghadi

यवतमाळ : नुकत्याच पार पडलेल्या नगरपंचायत निवडणुकीत यवतमाळ जिल्ह्यातील सहाही नगर पंचायतीवर महाविकास आघाडीने वर्चस्व प्रस्थापित केलेले आहे. नगराध्यक्षपदाचे आरक्षण घोषित झाल्यानंतर सोमवारी (ता. ३१) काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना नेत्यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठक विश्रामगृहात पार पडली. नगरपंचायत सत्तेसाठी महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करण्यावर एकमत झाले. ज्यांची सदस्य संख्या जास्त त्यांच्या गळ्यात नगराध्यक्षपदाची माळ पडणार असे असले तरी अंतिम सूत्रे ठरविण्यासाठी पुन्हा बैठक होण्याची चिन्हे आहेत.

महाविकास आघाडीच्या (Mahavikas aaghadi) राज्यस्तरीय समन्वयक समितीने दिलेल्या आदेशावरून तिन्ही पक्षांनी एकत्रित येऊन नगरपंचायतीत सत्ता स्थापन करण्यासाठी बैठक घेतली. अतिशय प्रतिष्ठेच्या व पक्षाची ताकद दाखविण्यासाठी राजकीय पक्षांनी नगरपंचायतींची निवडणूक स्वतंत्ररीत्या लढली. राज्याच्या सत्तेत सहभागी मित्रपक्षांनीही स्वतंत्र लढून आपली ताकद दाखवून दिली.

NCP, Shivsena
Mahavikas Aaghadi
मटण खाल्ल्यानंतर हे पदार्थ खाणे टाळा; अन्यथा या परिणामांना तयार राहा

सर्वाधिक उमेदवार निवडून आणून काँग्रेस (Congress) क्रमांक एकचा पक्ष, तर शिवसेना क्रमांक दोनचा पक्ष ठरला. महागाव, कळंब, बाभूळगाव, राळेगाव, झरी जामणी व मारेगाव या नगरपंचायतीत कोणत्या पक्षाचा नगराध्यक्ष होणार याकडे लक्ष लागले होते. राळेगावमध्ये काँग्रेसने एकहात्ती सत्ता मिळविली आहे. कोणत्याही परिस्थितीत भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. वरिष्ठ पातळीवरूनही तशाच प्रकारचे निर्देश देण्यात आले आहे. नगरपंचायतीत सत्ता स्थापन करण्यासाठी तिन्ही पक्षाचे नेत्यांनी एकत्र येऊन विचारमंथन केले.

सहाही नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेला (Shiv Sena) चांगल्या प्रमाणात यश मिळाले आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवत महाविकास आघाडी सत्ता स्थापन करेल, यावर एकमत झाले आहे. अंतिम सूत्रे ठरविण्यासाठी पुन्हा बैठक घेण्यात येऊ शकते. यात स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांनाही विश्‍वासात घेतले जाईल.
- पराग पिंगळे, जिल्हाप्रमुख, शिवसेना
NCP, Shivsena
Mahavikas Aaghadi
आंध्र प्रदेश सरकारची दुहेरी भेट; पगारात वाढ व निवृत्तीचे वय केले ६२
ज्यांची सदस्य संख्या जास्त त्या पक्षाचा नगराध्यक्ष होईल. वरिष्ठ पातळीवरून आलेल्या निर्देशानुसार महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षातील प्रमुख नेत्यांनी संयुक्त बैठक घेतली. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यावर तिन्ही पक्षाचे समन्वयकांना त्या-त्या ठिकाणी पाठविण्यात येईल.
- अ‍ॅड. वजाहत मिर्झा, अध्यक्ष, जिल्हा काँग्रेस कमिटी, यवतमाळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com