महावितरणची थकबाकी 54 कोटी

File photo
File photo

यवतमाळ : जिल्ह्यातील घरगुती , वाणिज्यिक व औद्योगीक वर्गवारीतील तीन लाख 46 हजार ग्राहकांकडे वीजबीलाचे तब्बल 54 कोटी थकीत आहेत. या वसुलीसाठी महावितरणने वसुली मोहिमेला गती दिली असून उपविभागनिहाय वसुलीचे टार्गेट देण्यात आले आहे.
थकबाकीदार ग्राहकांमध्ये जिल्ह्यातील तीन लाख 46 हजार 164 ग्राहकांचा समावेश आहे. त्यांच्याकडे 54 कोटी 33 लाख रुपये थकीत आहे. यवतमाळ विभागातील एक लाख 35 हजार 385 ग्राहकांकडे 22 कोटी सात लाख, पांढरकवडा विभागातील 88 हजार 366 ग्राहकांकडे 15 कोटी 64 लाख, तर पुसद विभागातील एक लाख 22 हजार 413 ग्राहकांकडे 16 कोटी 62 लाख रूपयाची थकबाकी आहे.
महावितरणच्या या कारवाईत थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याबरोबर संशयीत ग्राहकांचे वीज मिटर तपासण्यात येणार आहेत. या मोहिमेदरम्यान कोणताही ग्राहक वीज चोरी करत असल्याचे आढल्यास त्यांच्यावर विद्युत कायद्याअंतर्गत गुन्हाही दाखल करण्यात येणार आहे. वीज क्षेत्रातील उधारीचे दिवस संपले आहे. परिणामी, वितरीत केलेल्या विजेचे पैसे त्याच महिन्यात वसूल होणे अपेक्षित आहे. त्यामुळे वीज भरणा करणाऱ्या ग्राहकांना अखंडित आणि तत्पर सेवा देण्यासाठी महावितरण मोहीम सुरू केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com