कंपनीला ठोठावला एक कोटीचा दंड

File photo
File photo

अमरावती : भूमिगत केबल टाकण्याचे काम मुदतीपूर्वी न केल्याने महावितरण कंपनीने हैदराबाद येथील किशोर इन्फ्रा या कंपनीला 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावला.
अमरावती शहरात सध्या भूमिगत केबल तथा तत्सम कामे सुरू आहेत. ही कामे करण्याचे कंत्राट किशोर इन्फ्रा या कंपनीला देण्यात आले आहे. निविदा प्रक्रियेवेळीच ही कामे 2018 पर्यंत पूर्ण करण्यासंदर्भात महावितरणद्वारे नमूद करण्यात आले होते. 2016 मध्ये कंपनीने भूमिगत केबलच्या कामाला सुरुवात केली. परंतु, दोन वर्षे पूर्ण होऊनही हे काम पूर्ण न झाल्याने ठरल्याप्रमाणे महावितरण कंपनीने 1 कोटी रुपयांचा दंड सदर कंपनीला ठोठावला. सध्या शहरात भूमिगत केबल टाकण्याचे 75 टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित दोन महिन्यांत हे काम पूर्ण होईल, असे महावितरणकडून सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com