महावितरणला वादळाचा तडाखा

file photo
file photo

यवतमाळ : जोरदार वादळवाऱ्यासह आलेल्या पावसाने वीज महावितरणच्या यंत्रणेला मोठ्या प्रमाणात फटका बसला. जिल्ह्यातील अनेक भागांतील वीजपुरवठा ठप्प झाला होता. विस्कळीत झालेला वीजपुरवठा पूर्ववत करण्यात महावितरणला यश आले असले तरी त्यात महावितरणचे तब्बल पाच कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
वादळवाऱ्यामुळे लघु व उच्चदाब वाहिनीचे एक हजार 870 खांब कोसळले, लघु व उच्चदाबच्या 219 किलोमीटर वाहिनीच्या तारा तुटून पडल्या. जिल्ह्यात झालेल्या जोरदार वादळवाऱ्यामुळे ठिकठिकाणी मोठमोठे वृक्ष वीजयंत्रणेवर व वीज वाहिन्यांवर उन्मळून पडले होते. त्यात यवतमाळ विभागात लघु व उच्चदाब एकूण 453, पुसद विभागात एकूण एक हजार 146 व पांढरकवडा विभागात 271 असे एकूण 46 लाखांच्यावर रुपयांचे नुकसान झाले. लघु व उच्चदाबच्या वीजतारा तुटून यवतमाळ विभागात 40 किलोमीटर, पुसद विभागात 68 किलोमीटर व पांढरकवडा विभागात 110 किलोमीटर असे एकूण 219 किलोमीटर वीजवाहिनीच्या तार तुटून चार कोटी 92 लाख रुपयांचे नुकसान झाले. एकूण 19 ठिकाणी डीपी यंत्रणा कोसळून, तर बऱ्याच ठिकाणी महावितरण पेट्यांचे व रोहित्र बंद पडून आर्थिक नुकसान झाले आहे. अनेक भागांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. जिल्ह्यातील कृषीचा काही भाग वगळता सर्व भागांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आलेला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com