पंतप्रधानांकडून ‘एव्हरेस्टवीरां’चे कौतुक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 मे 2018

चंद्रपूर - जिल्ह्यातील पाच आदिवासी विद्यार्थ्यांनी एव्हरेस्ट सर करण्याचा पराक्रम केल्याची दखल खुद्द प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रविवारी (ता. २७) ‘मन की बात’मध्ये घेतली. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पंतप्रधानांनी शौर्य मोहिमेचे कौतुक केल्याबद्दल आभार मानत आनंद व्यक्त केला.

आदिवासी आश्रमशाळेतील कविदास काठमोडे, उमाकांत मडावी, परमेश आडे, मनीषा धुर्वे व विकास सोयाम या विद्यार्थ्यांनी १६ मे रोजी एव्हरेस्ट शिखरावर चंद्रपूर व महाराष्ट्राचा झेंडा रोवला. याची दखल ‘मन की बात’ कार्यक्रमात घेतल्यामुळे चंद्रपूरमध्ये सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे. 

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून राज्याच्या आदिवासी विकास विभागाने आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या उपजत धाडसाला ‘ऑपरेशन शौर्य’च्या माध्यमातून एव्हरेस्ट सर करण्यासाठी प्रशिक्षित केले होते. चंद्रपूर 
जिल्हा प्रशासन व आदिवासी विकास विभाग गतवर्षभर या मोहिमेच्या विविध आघाड्यांवर प्रयत्नरत होते.

‘मन की बात’मध्ये चंद्रपूर दुसऱ्यांदा
एव्हरेस्टच्या मोहिमेवरून परतण्यापूर्वीच पंतप्रधानांनी या प्रयत्नांचा उल्लेख आपल्या राष्ट्रव्यापी भाषणामध्ये करावा, ही चंद्रपूर जिल्हावासींसाठी अभिमानाची बाब आहे. पंतप्रधानांनी आदिवासी आश्रमशाळा प्रशासनाचेदेखील कौतुक केले. यापूर्वीही चंद्रपुरातील किल्ले सफाई मोहिमेचा उल्लेख पंतप्रधानांनी केला होता.

Web Title: mainsha dhurve narendra modi everest Appreciation