अपघातात पती-पत्नी, मुलगा व आई ठार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 ऑगस्ट 2019

धामणगावरेल्वे (जि. अमरावती) : नागपूर-औरंगाबाद एक्‍स्प्रेस हायवेवर घुईखेड गावाजवळ मारोती अल्टो व ट्रकच्या समोरासमोर झालेल्या धडकेत पती व मुलाचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर पत्नी व आईचा पुलगाव येथे मृत्यू झाला. ही घटना तालुक्‍यातील तळेगाव दशासर पोलिस ठाण्यांतर्गत रविवारला (ता.) दुपारी सुमारास घडली.

नागपूर येथील गोटाळ पांजरी, कस्तुरीनगर येथील रहिवासी अनिल सारंगधर चेंडकापुरे (वय 32) हे आपल्या चांदूररेल्वे येथील मूळगावी मारोती अल्टो कार (क्रमांक एम 40 एचयू 3409 ) याने येत होते. या कारमध्ये त्यांची पत्नी प्रज्ञा चेंडकापुरे (वय 27), आई लीलाबाई चेंडकापुरे व मुलगा कबीर चेंडकापुरे (वय 4 ) यांच्यासह अन्य दोन नातेवाईक होते. तळेगाव दशासर ते घुईखेड या गावादरम्यान विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने (क्रमांक : एमएच 17 बी-9743) समोरासमोर धडक दिली. त्यामुळे अनिल चेंडकापुरे व त्यांचा चिमुकला मुलगा कबीर याचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर पत्नी प्रज्ञा चेंडकापुरे व आई लीलाबाई चेंडकापुरे यांचा पुलगाव येथील रुग्णालयात उपचारादरम्यारन मृत्यू झाला. अन्य दोन जखमींना सेवाग्राम येथील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक योगेश शिरसाट, पोलिस कर्मचारी महादेव पोकळे करीत आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: major accident on aurangabad highway