बस अपघातात प्रवाशाचे मुंडके धडापासून वेगळे

रवींद्र शिंदे
शुक्रवार, 29 जून 2018

भोयर घाटात बसला कट लागल्याने एका प्रवाशाचे मुंडके धडापासून पूर्ण वेगळे झाले.

यवतमाळ - येथील दारव्हा मार्गावरील भोयर घाटात दोन बसमध्ये झालेल्या अपघातात एका प्रवाशाचे मुंडके धडापासून वेगळे झाले. ही घटना गुरुवारी (ता. 28) रात्री दहाला घडली. 

अकोला-यवतमाळ व नागपूर-पुसद या राज्य परिवहन मंडळाच्या बसमध्ये हा अपघात झाला. भोयर घाटात बसला कट लागल्याने एका प्रवाशाचे मुंडके धडापासून पूर्ण वेगळे झाले. घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला. तर, एक प्रवासी गंभीर जखमी झाला. हे प्रवासी नागपूर-पुसद बसने प्रवास करीत होते. अकोला-यवतमाळ या बसमध्ये 28 प्रवासी होते. त्यापैकी कुणालाही इजा झाली नाही. या घटनेची माहिती मिळताच आगार व्यवस्थापक व ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. वृत्त लिहेस्तोवर मृताचे नाव कळू शकले नव्हते. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: major accident at darvha road yavatmal