खोदलेल्या मलब्यावरुन जाताना मोटरसायकल अपघातात एक ठार, एक गंभीर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

कांनशिवणी ते मोरगाव काकड मार्गाने सुकळी नदापुर येथील रहिवाशी सचिन गजानन अनासने वय 18 वर्ष आणि त्याचा मित्र योगेश श्रीकृष्ण सारसे वय 19 वर्ष हे दोघे मोटर सायकल क्रमांक एम. एफ. क्यू. 5454 ने मोझर येथे नातवाईकाकडे जात असताना रस्त्यावरील एका वळणाजवळ शेतातील खोदलेल्या विहिरीच्या मलब्यावर मोटरसायकल सह जाऊन धडकले.

अकोला : कानशिवणी ते मोरगाव काकड रस्त्यावर येत असलेल्या एका वळणाला लागून शेत आहे. त्या शेतात विहीर खोदली असून खोदलेल्या मलब्यावर रस्त्याने जाणारी भरधाव मोटरसायकल धडकल्याने अपघात झाला. त्यामध्ये मोटरसायकल वरील एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला असल्याची घटना गुरुवारी सकाळी 10.30 वाजता दरम्यान घडली. अपघात एवढा विचित्र होता की मृतक चक्क विहिरी फेकल्या गेला.

कांनशिवणी ते मोरगाव काकड मार्गाने सुकळी नदापुर येथील रहिवाशी सचिन गजानन अनासने वय 18 वर्ष आणि त्याचा मित्र योगेश श्रीकृष्ण सारसे वय 19 वर्ष हे दोघे मोटर सायकल क्रमांक एम. एफ. क्यू. 5454 ने मोझर येथे नातवाईकाकडे जात असताना रस्त्यावरील एका वळणाजवळ शेतातील खोदलेल्या विहिरीच्या मलब्यावर मोटरसायकल सह जाऊन धडकले. त्यामुळे मोटरसायकल वरील सचिन अनासने हा चक्क विहिरीत 20 ते 25 फूट दूर फेकल्या गेल्याने तो जखमी होऊन पाण्यात पडला. त्यामुळे या अपघात त्याचा मृत्यू झाला. तर जखमी योगेश सारसे याला अकोला येथे सर्वोचार रुग्णालयात उपचारार्थ भरती केले असून मृतक सचिन अनासने याचा मृतदेह विहिरीत पडला असल्याने ठाणेदार नंदकिशोर नागलकर यांनी संत गाडगे बाबा पथकाला पाचारण केले. मात्र विहिरीला पाणी मोठ्या प्रमाणात असल्याने सचिनचा मृतदेह शोधण्यासाठी संत गाडगे बाबा पथकाला कसरत करावी लागली. पथकातील सागर आटेकर, महेश साबळे, सूरज ठाकूर, अमोल खाडे यांनी मात्र अखेर 1 वाजता सचिनचा मृतदेह   बाहेर काढला. घटनास्थळी बार्शीटाकळी तहसीलदार रवी काळे, तलाठी राजेश चवरे, ग्रामसेवक डी. ए. डोंगरे, पोलिस पाटील विनायक इंगळे, हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत अवताडे, तुषार मोरे, अरुण गिर्हे, आयाज खान हजर होते. दरम्यान या अपघातामुळे सुकळी नदापुर गावात शोककळा पसरली आहे.

Web Title: Major Bike Accident At Kanshivni to Morgaon Kakad Akola Road One Died One Injured