Video : कोंढाळी मार्गावर डिझेल टॅंकर पलटला, भीषण आग 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

कोंढाळी (जि. नागपूर) : नागपूर-अमरावती महामार्गावरील कोंढाळी नजीकच्या जाम नदीच्या पुलावर डिझेल भरून जाणाऱ्या टॅंकरचा टायर फुटल्याने पुलाला धडक दिल्यावर टॅंकर उलटला. यानंतर संपूर्ण टॅंकरला आग लागल्याची घटना दुपारी पावणे तीन वाजताच्या सुमारास घडली. यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक बंद पडली. दोन्ही बाजूने वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. या घटनेत एका व्यक्तीचा मृतदहे आढळून आला आहे. मात्र त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. 

खोल खड्डयात पडली होती रुग्णवाहिका 
कोंढाळी मार्गावर शनिवारी भरधाव रुग्णवाहिका चालकाचे नियंत्रण सुटल्याने वीस फूट खोल खड्डयात पडली होती. त्या घटनेत रुग्णासह चार जण गंभीर जखमी झाले होते. आकोट येथे विश्रांतीसाठी परत जाणाऱ्या रुग्णाला परत उपचारासाठी नातेवाईकांसह दाखल करण्याची वेळ आली होती. त्या घटनेची चर्चा संपली नसतानाच दुसऱ्याच दिवशी पुन्हा अपघात झाला. 

घर्षणामुळे पेट 
रविवारी मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील नागपूर-अमरावती दरम्यान दुपारी दोन वाजून 45 मिनिटांनी कोंढाळी नजीकच्या जाम नदीच्या पुलाजवळ डिजेल भरून येणारा भरधाव टॅंकर उलटला. या टॅंकरमध्ये असलेल्या डिजेलने घर्षणामुळे पेट घेतला. 

टॅंकरची ओळख पटली नाही 
अपघातनंतर लगेच संपूर्ण टॅंकर धू-धू करीत जळू लागला. या टॅंकरचे चालक व वाहक दोघेही बेपत्ता आहेत. याशिवाय आग मोठ्या प्रमाणात लागल्याने त्याच्या जवळ जाण्याची हिमंतही कुणी करू शकत नसल्याने दोघांचा शोध घेतला जाऊ शकला नाही. कोंढाळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टॅंकर पूर्णता: जळून राख झाल्याने त्याचा क्रमांक व तो कोणत्या कंपनीचा होता हे देखील ओळखता आले नाही. 
 
Image may contain: one or more people, people standing, crowd, sky, tree and outdoor
बघ्यांची गर्दी 

चालकाची ओळख पटणे अवघड 
इंधनाचा वासावरून तो डिझेलचा टॅंकर असल्याचा अंदाज आहे. या गाडीत किती जण होते हे देखील कळू शकले नाही. एक मृतदेह आग नियंत्रणात आणल्यावर दिसून आला. मात्र त्याचीही ओळख पटविण्यात यश आलेले नाही. टोल नाक्‍यावरून टॅंकरबाबतची माहिती व क्रमांकाची ओळख पटविण्यात येणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: major fire diesel tanker near kondhali