40 हजार नळधारकांना झटका; "मजीप्रा'चे नवीन दर लागू

file photo
file photo

यवतमाळ : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पाणीटंचाईच्या शेवटच्या टप्प्यात यवतमाळवासींना दरवाढीचा झटका दिला आहे. एप्रिल व मे महिन्याचे बिल नवीन दरानुसार ग्राहकांना दिले जाणार आहे. एक जुलै 2018 पासून दरवाढ लागू केल्याने वर्षभराची थकबाकी ग्राहकांना भरावी लागणार आहे. पाणी येत नसले; तरी बिल मात्र येत आहे. त्यामुळे प्राधिकरणाच्या कारभारावर नागरिकांनी आगपाखड सुरू केली आहे.
शहरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे जवळपास 40 हजार ग्राहक आहेत. त्यांना निळोणा तसेच चापडोह येथील पाण्याचे शुद्धीकरण करून पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी शून्य ते 30 हजार लिटरपर्यंत हजार लिटरमागे 15 रुपये 70 पैसे दर होते. या दरात शासनाने वाढ केली आहे. एक जुलै 2018 पासून घरगुती, बिगरघरगुती तसेच "ना नफा ना तोटा' या तत्त्वावर सर्व नळधारकांना दरवाढ लागू करण्यात आली आहे. एकीकडे पाणी मिळत नसल्याची ओरड शहरातील सर्वच भागातील नागरिक करतात. त्यातच प्राधिकरणाने केलेल्या पाण्याच्या दरवाढीवर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पाणी येत नसताना प्राधिकरण बिल मात्र नियमित पाठवीत असल्याचा आरोपही नागरिकांचा आहे. नवे दर आणि त्यातही नऊ महिन्यांची थकबाकीची रक्कम पुढील महिन्यात येणाऱ्या बिलात येणार आहे. त्यामुळे ग्राहकांना आणखी भुर्दंड बसणार आहे. शहरातील अनेक भागात नवीन जलवाहिनी टाकण्यात आली आहे. रस्ते होणार असल्यामुळे नागरिकांनी खबरदारी म्हणून जलवाहिनीपासून घरापर्यंत पाइप टाकून ठेवले आहेत. या नागरिकांना पाण्याचा एक थेंबसुद्धा मिळाला नसताना प्राधिकरणाने या ग्राहकांना बिल पाठविण्याचा प्रकार घडला आहे. नागरिकांनी ओरड केल्यानंतर जीवन प्राधिकरणाने झालेले चूक सुधारली. मात्र, नागरिकांनी प्राधिकरणाच्या कामावर चांगलेच ताशेरे ओढले आहे. उन्हाळ्यात नागरिकांना पाणी मिळाले नाही. त्यात सुधारणा करण्याऐवजी दर वाढविल्याने नागरिकांनी प्राधिकरणाच्या कामावर आक्षेप घेतला आहे.
----------
प्रकार जुने दर नवे दर (0 ते 30हजार लिटरचे दर)
घरगुती 15.70 17.30
बिगर घरगुती 72.60 79.90
ना नफा ना तोटा 30.30 33.30

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com