शेतमालाचे हमीभाव पडतात किंवा पाडले जातात - मकरंद अनासपुरे

makrand-ansapure
makrand-ansapure

चिमूर -  नाम फाऊंडेशनची व्याप्ती हळु हळु वाढत असुन आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंब, शेतकरी व त्यांना आत्मनिर्भर करून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्या करीता विनामुल्य सेवा देणाऱ्या कार्यकर्त्यांची फळी आवश्यक आहे. कर्जमाफी हा पुर्ण उपचार नसुन शेतमालास हमी भाव मिळायला पाहीजे. बाजारात शेतमालाचे भाव पडतात किंवा पाडले जातात, त्यामुळे शेतकऱ्यांच्या कष्टाचे चिज होत नसुन याकडे सर्व राज्यकर्त्यांनी लक्ष देण्याची गरज असल्याची भावना मकरंद अनासपुरे यांनी दिलखुलास मुलाखतीतुन व्यक्त केली .

सिनेसृष्टीच्या मायावी क्षेत्रात यशोशिखर गाठुनही जमीनीवर पाय असणाऱ्या समाजभान ठेवुन आत्महत्याग्रस्त शेतकरी कुंटूब तसेच सैनिकांच्या परीवाराकरीता आर्थिक , भावणीक आणी स्वालंबनाचा मंत्र देणाऱ्या मकरंद अनासपुरे यांची मुलाखत नेरी येथील गुरुदेव सांस्कृतीक मंडळाद्वारे आयोजीत झाडी पट्टयातील प्रसिद्ध नाटक गद्दार याच्या एकविसाव्या प्रयोगा निमीत्य नाटय प्रयोगातील मधल्या काळात घेतली. नाटकात नाम्या नावाचे पात्र साकारून विनोदाने धमाल उडवुन दिली . मुलाखतीने एक हसत मुख  जिंवत माणसाचे दर्शन झाले . 

झाडीपट्टीतिल नाटकाविषयी प्रतिक्रीया विचारली असता मकरंद अनासपुरे यांनी सांगितले की झाडीपट्टी नाट्य विश्व फार जुने असुन त्याला आदर्श परंपरा आहे . शेतकऱ्यांच्या हंगामातील कष्टातुन विसावा मिळून त्यांचे मनोरंजन करण्याकरीता नाटकांचे आयोजन केल्या जाते त्यामुळे प्रेक्षक संख्या जास्त आहे. झाडीपट्टीतिल कलांवतानी हि कला जिंवत ठेवली आहे. सिनेसृष्टीने याकडे लक्ष द्यायला पाहीजे आणी सिनेमे बनवायला पाहीजे, ज्यामुळे झाडीबोलीभाषेच्या गोडव्याचा लाभ इतरांना घेता येईल. मुख्यमंत्र्याना भेटून झाडीपट्टयात रंगमंच निर्मीती आणी झाडीपट्टी नाटय विश्वास पोषक वातावरण निर्माण करण्याविषयी चर्चा करू, असे अनासपुरे यांनी सांगीतले.

नाव फाऊंडेशनच्या कार्या विषयी माहीती देताना सांगीतले की, 'नामच्या वतीने शहीद जवानांच्या विधवा , आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या विधवांना शिलाई मशीन वाटप व व्यवसाय प्रशिक्षण देण्यात येते . जलसंधारणाचे १२८ गावात काम केले असुन नदी , नाले , ओढे , तलाव यांना पुनरजिवित करून शेतकऱ्यांना सिंचणाची मोठी सोय करून देण्यात आली . सांगली येथील पामगंगा नदीचे ९ की मी पर्यंतचे खोली करण दोन महिन्यात करून नदीस पुनर जिवित करण्यात आले ज्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न उत्पन्न ३ते ४ लाखाच्या जवळ झाले त्यापुर्वी सात वर्ष उत्पन्नच घेतले नव्हते . लातुरमध्ये २५ लाखाचे डाळींब शेतकऱ्यानी पिकविले' .

'हि सगळी कामे करीत असताना चांगली माणसे मिळाल्यास व्याप्ती वाढेल. माझे पोट भरले इतरांशी काही देणे घेणे नाही, हि प्रवृत्ती सोडली पाहीजे . माणुस म्हणुन आपण किती पात्र आहोत याचे परीक्षण स्वतः करायला पाहीजे . यशस्वी झाल्यानंतरच माणसाचे महत्व कडते मात्र हे यश मिळविण्या करीता सोशलेल्या हालअपेष्टा , कष्ट हे ज्याचे त्यालाच माहीत असते,' अशा प्रकारे नाटय प्रवेशा दरम्यान मकरंद अनासपुरे यांनी हितगूज साधले .

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com