शेतकऱ्यांनो, घरीच बनवा ‘फेरोमन ट्रॅप’

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 ऑगस्ट 2018

यवतमाळ - गुलाबी बोंडअळीचा प्रकोप यंदाही कपाशीवर जाणवत आहे. त्यापासून संरक्षण करण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना ‘फेरोमन ट्रॅप’चा दिलेला सल्ला महागडा ठरत आहे. मात्र, टाकाऊ वस्तूपासून ‘फेरोमन ट्रॅप’ घरीच बनविण्याचा यशस्वी प्रयोग कृषी सहाय्यक दिगंबर गोरे यांनी केला आहे. 

यवतमाळ - गुलाबी बोंडअळीचा प्रकोप यंदाही कपाशीवर जाणवत आहे. त्यापासून संरक्षण करण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना ‘फेरोमन ट्रॅप’चा दिलेला सल्ला महागडा ठरत आहे. मात्र, टाकाऊ वस्तूपासून ‘फेरोमन ट्रॅप’ घरीच बनविण्याचा यशस्वी प्रयोग कृषी सहाय्यक दिगंबर गोरे यांनी केला आहे. 

गेल्या वर्षी कपाशीवर आलेल्या बोंडअळीने शेतकऱ्यांना पार उद्‌ध्वस्त केले. कीटकनाशक फवारणीमुळे जिल्ह्यात २१ शेतकरी, शेतमजुरांचे बळी गेले. साडेसातशेच्या घरात बाधित झालेत. या संकटातून सावरण्यापूर्वीच या खरीप हंगामात पुन्हा बोंडअळीने कपाशीवर आक्रमण केले.  कृषी विभागाने ‘फेरोमन ट्रॅप’ अर्थात कामगंध सापळे लावण्याचा सल्ला शेतकऱ्यांना दिला. गेल्या वर्षीप्रमाणे शेतात नांगर फिरविण्याची वेळ येऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी कृषी केंद्र गाठून ‘फेरोमन ट्रॅप’ खरेदी करण्यासाठी गर्दी केली. एका कामगंध सापळ्याची किंमत ६० ते ७० रुपयांच्या घरात गेली. बोंडअळीपासून रक्षण करण्यासाठी एकरी पाच कामगंधे सापळे लावावे लागतात. 

यासाठी एकरी ३५० रुपयांचा खर्च शेतकऱ्यांना येतो. हा खर्च महागडा ठरत असल्याने हा खर्च कमी करण्याची कल्पना कृषी सहाय्यक दिगंबर गोरे यांना सुचली. टाकाऊ असलेल्या बिसलेरी बॉटलचा उपयोग करून ‘लुर्स’त्यात अडकविण्याचा प्रयोग केला आहे. कृषी विभागाचे कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी या प्रयोगाची दखल घेतली आहे.  

असा तयार होतो  कामगंध सापळा
खाली झालेली पाण्याची बॉटल घ्यायची. झाकणाच्या खाली चारही बाजूने चार खिडक्‍या (पोस्टाच्या डब्याप्रमाणे) तयार करायच्या. झाकणाला एक छिद्र पाडून आत तार सोडायची. त्या तारेच लुर्स अटकवायचा. सुगंधाने येणारी नर पतंग त्यात अलगद अडकते.

‘लुर्स’चा कृत्रिम तुटवडा
कामगंध सापळ्यात लटकणाऱ्या ‘लुर्स’च्या सुगंधाने नर पतंग त्याकडे आकर्षित होऊन अलगद सापळ्यात फसते. त्यामुळे कृषी केंद्र चालकांनी लुर्सचा कृत्रिम तुटवडा निर्माण केल्याची ओरड ऐकायला मिळत आहे.

Web Title: Make Farmers Ferron Trap at Home