सूर्योदयनगरवासीयांना प्राथमिक सुविधांची वानवा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

हुडकेश्‍वर : स्मार्टसिटी, मेट्रोसिटी अशी बिरुद मिरविणारी उपराजधानी आणि दुसरीकडे याच शहरात मागासलेपणाची उपेक्षा भोगणाऱ्या वस्त्या, अशी प्रगत व अप्रगतपणाची मोठी दरी दिसून येते. हुडकेश्वर रोडवरील साईनगरपासून डावीकडे लागून असलेल्या सूर्योदयनगरची अशीच अवस्था आहे. सूर्योदयनगरमध्ये अद्याप रस्ता पोचलेला नसल्याने नागरिकांना दररोज चिखल तुडवतच प्रवास करावा लागतो. त्यामुळे शाळकरी विद्यार्थी व नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो.

रोडवरील साईनगर आणि त्यापासून 500 मीटर अंतरावरचे सूर्योदयनगर ही सुमारे 500 घरांची लोकवस्ती. गेल्या पाच ते सात वर्षांपासून वसलेली आहे. मजूर, कामगारांपासून ते नोकरदार अशा सर्व वर्गाचे लोक येथे वासव्यास आहे. हळूहळू वस्तीही वाढली आहे. शहरात सर्वांत वेगाने विकसित होणाऱ्या क्षेत्रात दक्षिण नागपूरच्या हुडकेश्वर भागाचा उल्लेख होतो. असे असूनही सूर्योदयनगर यापासून वंचित राहिले आहे. वस्तीला जोडणारा रस्ताच उपलब्ध नाही. त्यामुळे रिकाम्या असलेल्या शिवारामधून काढलेली पायवाट हाच येथील नागरिकांचा रस्ता. उन्हाळा, हिवाळा निघून जातो, पण पावसाळ्यात शहरापासून संपर्क तुटल्यासारख्या नरकयातना लोकांना भोगाव्या लागतात. सिमेंट रोडपासून एका राजकीय नेत्याच्या कॉलेजपर्यंत रस्ता पोहोचला पण वस्तीपर्यंत रस्ता बनविण्याची गरज कुणाला वाटली नाही अशी कैफियत स्थानिक नागरिकांनी सकाळकडे मांडली.

वस्तीतील अंतर्गत रस्त्यावरही गिट्टी पसरवून ठेवली आहे. मात्र, पक्का रस्ता झाला नाही. रस्त्याशिवाय रोड, गडरलाइन आणि जलवाहिनीही येथे अद्याप पोहोचली नाही. ही कामे मंजूर आहे, पण केली जात नसल्याचे नागरिकांनी सांगितले. कच्च्या रस्त्यामुळे पावसाळा नागरिकांसाठी जीवघेणा ठरत आहे. प्राथमिक सुविधांसाठीही आणखी किती वर्षे वाट पहावी लागेल, हा प्रश्न नागरिकांना पडतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com