कठोर कायदे करा अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन

वृत्तसंस्था
मंगळवार, 24 जुलै 2018

जिल्हयात दारूबंदीची यशस्वी अंमलबजावणी करण्याकरीता कठोर कायदे करण्याच्या मागणीचे निवेदन तालुका मनसेच्या वतीने उपविभागीय अधिकारी चिमूरच्या मार्फत मुख्यमंत्री, पालकमंत्री इत्यांदीना देण्यात येऊन या मागणी विषयी 6 ऑगस्टपर्यंत सकारात्मक पाऊले उचलण्यात न आल्यास मनसेतर्फे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आल्याची माहीती आयोजित पत्रकार परीषदेतुन मनसे तालुकाप्रमूख प्रशांत कोल्हे यांनी दिली.

चिमूर- जिल्हयात दारूबंदीची यशस्वी अंमलबजावणी करण्याकरीता कठोर कायदे करण्याच्या मागणीचे निवेदन तालुका मनसेच्या वतीने उपविभागीय अधिकारी चिमूरच्या मार्फत मुख्यमंत्री, पालकमंत्री इत्यांदीना देण्यात येऊन या मागणी विषयी 6 ऑगस्टपर्यंत सकारात्मक पाऊले उचलण्यात न आल्यास मनसेतर्फे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आल्याची माहीती आयोजित पत्रकार परीषदेतुन मनसे तालुकाप्रमूख प्रशांत कोल्हे यांनी दिली.

जिल्हयात फसलेल्या दारूबंदी निर्णयाची यशस्वी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने चिमुर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शासनास विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले. त्याविषयी माहिती आणि मनसेच्या वतीने करण्यात येणाऱ्या आंदोलनाविषयी माहीती देण्याकरीता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.

या पत्रकार परिषदेत मनसे तालुका प्रमुख प्रशांत कोल्हे यांनी सांगीतले की, जिल्हयात करीता 1 एफ्रील 2015 ला दारूबंदीची घोषणा करण्यात आली होती. याचे मनसेच्या वतीने स्वागत करण्यात आले. मात्र, इच्छाशक्ती आणि अंमलबजावणीतील त्रृटीमुळे अवैध दारूचा ओघ वाढला असून, गल्ली बोळात दारू मिळायला लागली. त्यामुळे, जिल्हयात दारूबंदी फसली. या सोबतच गांजा, अफीम, ड्रग्ज याचे युवकामध्ये प्रमाण वाढले.

कमी वेळात जास्त पैसा कमविण्याकडे तरूणांचे कल वाढले असुन यामुळे दारू विक्री व तस्करीमुळे युवकाचे भविष्य अंधकारमय होत आहे. यावर उपाय म्हणुन यशस्वी अंमलबजावणी करण्याकरीता दारू विक्रेत्यास ताब्यात घेतल्यानंतर संपुर्ण मुद्देमालाची सखोल चौकशी करुण वापरलेले वाहन शासणाने जप्त करावे. कोणत्या दुकानातील माल आहे याचा शोध घेऊन त्याचा परवाणा रद्द करावा, जिल्हास्तरावर कठोर अंमलबजावणी करीता स्वतंत्र विभाग स्थापण करुन त्यावर जबाबदारी द्यावी, ग्राम सुरक्षा दलास विशेष अधिकार देऊन संरक्षण द्यावे, तीनदा दारू विक्री, वाहतुक किंवा साठवणुकीचा गुन्हा नोंद झाल्यास त्याला कायमचे जिल्हयातुन हद्दपार करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली असून 6 ऑगष्टपर्यंत यावर सकारात्मक पाऊले न उचलल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

या पत्रकार परीषदेला मनसे तालुका प्रमुख प्रशांत कोल्हे, शहर अध्यक्ष नितिन लोणारे, तालुका सचिव संजय वाकडे, तालुका उपाध्यक्ष बाबाराव पाटील, राहुल पीसे, अरमान बारसागडे व सुरज शेंडे इत्यादी मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Make strickt laws related wine ban, otherwise MNS get movement