गंभीर! भाच्याने केला मामाचा खून

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

समुद्रपूर (जि. वर्धा) : घरगुती वादातून भाच्याने चाकूने वार करून मामाला संपविल्याची घटना पोळा सणाच्या पूर्वसंध्येला घडली. भोजराज रामचंद्र झोडापे (वय 45) असे मृताचे नाव आहे.

समुद्रपूर (जि. वर्धा) : घरगुती वादातून भाच्याने चाकूने वार करून मामाला संपविल्याची घटना पोळा सणाच्या पूर्वसंध्येला घडली. भोजराज रामचंद्र झोडापे (वय 45) असे मृताचे नाव आहे.
भोजराज झोडापे हा आपल्या कुटुंबासह वॉर्ड क्रमांक 3 मध्ये राहतो. काही दिवसांआधी त्याचा भाचा कमलेश मोरे हा सुद्धा त्याच्या घरी राहत होता. मात्र दोन महिन्यांपूर्वी कमलेशने प्रेमविवाह केला. विवाहानंतर तो मामाकडे सुमारे 15 दिवस वास्तव्यास होतो. त्यानंतर मामाच्या घरापासूनच काही अंतरावर फुलचंद खैरे यांच्याकडे भाड्याने खोली घेऊन राहत होता. दरम्यान, आज मामा आणि भाच्यामध्ये काही कारणावरून वाद झाला. वाद विकोपाला गेल्याने कमलेशने मामा भोजराजच्या पोटावर धारदार शस्ताने वार केला. यात भोजराज यांचा मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती मिळताच ठाणेदार हेमंत चांदेवार यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mama murdered by nephew

टॅग्स