अखेर जखमी पतीचाही मृत्यू...

nagpur
nagpur

नागपूर : कौटुंबिक वाद विकोपाला गेल्याने पती रविंद्र हरीराम नागपुरे (वय 47) याने पत्नी मिना (वय 40) यांच्यावर गोळीबार करून खून केल्यानंतर स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. गंभीर जखमी अवस्थेत रवी यांना मुलाने मेडिकलमध्ये दाखल केले होते. मात्र, आज बुधवारी पहाटेच्या सुमारास रवीचा मृत्यू झाला. या प्रकरणी सक्‍करदरा पोलिसांनी रवीवर पत्नीच्या खुनाचा गुन्हा दाखल केला आणि नंतर आत्महत्या केल्याची नोंद केली. 

रवी नागपुरे हा प्लायवूडचा व्यापारी होता. त्याचा गेल्या काही महिन्यांपासून व्यवसाय चौपट झाला होता. त्यात त्याचा पत्नीशी वाद झाला झाला. कौटूंबिक वाद विकोपाला गेल्यामुळे त्यांनी विभक्‍त होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दीड महिन्यांपूर्वी मीना या मुलगा अनिकेत (वय 17) याला घेऊन सक्‍करदरा हद्‌दीतील दत्तात्रय नगरात राहायला आल्या होत्या. त्यांनी न्यायालयात पती रवीविरूद्ध खटलाही दाखल केला होता. त्यामुळे पती-पत्नीत पुन्हा वितृष्ठ निर्माण झाले होते. गेल्या काही दिवसांपासून मीना या रवि याला पैशाची मागणी करीत होत्या. मात्र, रवी पैसे देण्यास नकार देत होता. मंगळवारी रात्री दहा वाजता रवी कारने दत्तात्रय नगरातील पत्नीच्या घरी आला. त्यावेळी त्या जेवन करीत होत्या तर मुलगा अनिकेत टीव्ही बघत होता. दरम्यान रवी घरात आला. त्याने पत्नीशी वाद घातला. त्यानंतर पाठीमागे लपविलेली पिस्तूल काढली आणि मीनाच्या गोळीबार केला. मीना यांच्या छातीत गोळी लागल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर स्वतःवरही दोन गोळ्या झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

पिस्तूल आणले कुठून? 
रवी हा प्लायवूडचा व्यापारी असून त्यांच्यावर आतापर्यंत कोणताही गुन्हा दाखल नाही. त्याचा कुणा गुंडाशीही संबंध नाही. परंतु पूर्वनियोजीत कट आखून पत्नीचा खून करण्याचे ठरविले. त्यामुळे त्याने एका गुन्हेगाराकडून अवैधरित्या पिस्तूल विकत घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

मंगळवारी होती कोर्टात तारीख 
मीना यांनी रवीवर खावटीचा खटला भरला होता. मंगळवारी दोघांची पेशी होती. मीना यांनी न्यायालयात पोहचून बाजू मांडली तर रवी हे उपस्थित झाले नाही. मीना यांना पतीकडून खावटी मंजूर झाली. आता पत्नीला पैसे द्यावे लागणार, याची खात्री पटल्यामुळे रवीने पत्नीने खून केल्याची माहिती आहे. 

...म्हणून केली आत्महत्या 
आरोपी रवीला पत्नीचा खून करून कारने पळ काढायचा होता. त्यामुळे त्याने कारलाच किल्ली लावून ठेवली होती. रवीने पत्नीवर घरात घुसून गोळीबार केला. पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना मुलगा अनिकेतने दरवाजा लावून घेतला. त्यामुळे दुसऱ्या खोलीतून पळ काढण्याचा प्रयत्न त्याने केला. अनिकेतने दुसऱ्याही खोलीचा दरवाजा लावून घेतला. तिसरा मार्ग नसल्यामुळे रवीने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com