तरुणींची खरेदी करणाऱ्यास बनारस येथून अटक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

यवतमाळ : तरुणींना नोकरीचे आमिष दाखवून त्यांची बनारस (उत्तर प्रदेश) येथे विक्री होत असल्याची खळबळजनक घटना 12 जुलैला उघडकीस आली होती. अखेर तरुणींची खरेदी करणाऱ्या मुख्य संशयिताला बनारस येथून अटक करण्यात आली. ही कारवाई यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी केली.

राजू श्‍यामलाल पटेल (वय 29, रा. रामपूर, जि. वाराणसी) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. पुसद तालुक्‍यातील ब्रम्ही येथील प्रकाश काळे हा गरजू तरुणींना नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून परराज्यात नेऊन तिथे राजू पटेल याला विकायचा. जोडमोहा (ता. कळंब) येथील पीडितेने बनारस येथून आपली सुटका करून घेतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला होता. पोलिसांनी तत्काळ त्यावेळी प्रकाश काळे याला अटक केली होती. मात्र, तरुणींची खरेदी करणारा मोकळाच होता. राजू पटेल याने जोडमोहा येथील तरुणीसह अन्य दोन मुलींची खरेदी केली होती. तो मुलींना ढाब्यावर नृत्य करण्यासाठी पाठवायचा. पटेल याने जोडमोहा येथील तरुणीवर अत्याचारदेखील केला होता.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: man arrested from Banaras for buying young girls