
रामेश्वर प्रेमसिंग पवार (वय 28, रा. आरंभी), असे मृताचे नाव आहे. तरुण गजानन राठोड याला मोबाइलवर फोन करून त्रास देत होता. या कारणातून रस्त्यावर रामेश्वर व गजानन राठोड यांच्यात वाद होऊन हाणामारी झाली.
दिग्रस (जि. यवतमाळ) : फोनद्वारे त्रास देत असल्याच्या क्षुल्लक कारणातून वाद करीत तरुणाच्या डोक्यावर सेंट्रीग लाकूडचा हल्ला करून खून केला. ही घटना सोमवारी (ता.एक) सायंकाळी साडेपाच वाजता दरम्यान घडली. या घटनेने आरंभी येथे एकच खळबळ उडाली.
हेही वाचा - यवतमाळच्या पालकमंत्रीपदासाठी राष्ट्रवादीकडून लॉबिंग सुरू? पुसदचा बंगला केंद्रस्थानी;...
रामेश्वर प्रेमसिंग पवार (वय 28, रा. आरंभी), असे मृताचे नाव आहे. तरुण गजानन राठोड याला मोबाइलवर फोन करून त्रास देत होता. या कारणातून रस्त्यावर रामेश्वर व गजानन राठोड यांच्यात वाद होऊन हाणामारी झाली.
सेंट्रीग लाकडाचा घाव डोक्यावर बसल्याने तरुण गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ उपचारासाठी दिग्रस येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रात्री साडेनऊ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी भारत पवार याने दिग्रस पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
हेही वाचा - धक्कादायक! अमरावती जिल्हापरिषदेत कोरोना ब्लास्ट; एकाच दिवशी 13 कर्मचारी पॉझिटिव्ह
त्यावरून गजानन राठोड, दीपक राठोड (वय 42), माणिक राठोड (वय 38, सर्व रा. आरंभी) यांच्यासह एका विधीसंघर्षग्रस्त बालकाविरुद्घ गुन्हा नोंदविला. दिग्रस पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृताच्या पश्चात आई, वडील, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सोनाजी आम्ले यांच्या मार्गदर्शनात रवींद्र जगताप, नरेंद्र पुंड, ब्रह्मदेव टाले करीत आहे.
संपादन - अथर्व महांकाळ