वडकी येथे वाहनाच्या धडकेत व्यक्ती ठार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 ऑगस्ट 2019

वडकी (जि. यवतमाळ) :  वाहनाच्या धडकेत पायी जाणारी व्यक्ती ठार झाल्याची घटना वडकीजवळील नागपूर-हैदराबाद महामार्गावर बुधवारी (ता. 28) सकाळच्या सुमारास घडली. शिवसर्जन मारजी केराम (वय 55, रा. येरला, ता. हिंगणघाट) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. शिवसर्जन केराम हे मंगळवारी (ता. 27) राळेगाव तालुक्‍यातील वडकी येथे आले होते. मात्र उशिरापर्यंत ते रात्री घरी पोहोचले नाही. त्यांचा शोध घेतला असता नागपूर-हैदराबाद महामार्गावर एका पुलाजवळ त्यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती वडकी पोलिसांना देण्यात आली.

वडकी (जि. यवतमाळ) :  वाहनाच्या धडकेत पायी जाणारी व्यक्ती ठार झाल्याची घटना वडकीजवळील नागपूर-हैदराबाद महामार्गावर बुधवारी (ता. 28) सकाळच्या सुमारास घडली. शिवसर्जन मारजी केराम (वय 55, रा. येरला, ता. हिंगणघाट) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. शिवसर्जन केराम हे मंगळवारी (ता. 27) राळेगाव तालुक्‍यातील वडकी येथे आले होते. मात्र उशिरापर्यंत ते रात्री घरी पोहोचले नाही. त्यांचा शोध घेतला असता नागपूर-हैदराबाद महामार्गावर एका पुलाजवळ त्यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती वडकी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी राळेगाव येथील शासकीय रुग्णालयात पाठविले. शिवसर्जन वडकी येथून आपल्या गावाकडे पायी जात असताना एका अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. प्रकरणी वडकी पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Man killed in vehicle collision at Vadki