युवकानं केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग; घाबरून तिनं गाठलं पोलिस स्टेशन; गुन्हा दाखल

Man misbehaved with girl in Amravati
Man misbehaved with girl in Amravati

अमरावती ः युवकाने शालेय विद्यार्थिनीला तू आवडतेस...सोबत पळून जाऊ, या शब्दात अल्पवयीन मुलीशी असभ्य वर्तन केले. याप्रकरणी संशयित आरोपी धनराज सुखदेव वरखडे (वय 25) विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे शिरसगावकसबा पोलिसांनी सांगितले.

एका गावातील मुलीची महिनाभरापूर्वी धनराज सोबत ओळख झाली. तेव्हापासून ती शाळेत जात असताना तो तिचा पाठलाग करू लागला. बसस्थांब्यापर्यंत येऊन जवळिक साधण्याचा प्रयत्न केला. त्याने पीडितेला गाठून तू मला आवडते...सोबत पळून जाण्याचा आग्रह धरला. घडलेल्या प्रकारामुळे मुलगी घाबरली. काही दिवस युवकाकडून होणारा त्रास ती सहन करीत होती. 

दोन दिवसांपूर्वी ती शाळा सुटल्यानंतर पुन्हा बसस्थांब्यावर उतरताच त्याने तिला पुन्हा अडविले. सोबत पळून चलण्याचा आग्रह तिच्याकडे धरला. पीडितेने त्याला स्पष्ट नकार दिला असता त्याने मुलीला तिचा मोबाईल क्रमांक मागितला. तिने मोबाईल क्रमांक देण्यालाही नकार दिला. 

युवकाकडून त्रास वाढल्यामुळे अखेर पीडितेने घटनेची तक्रार शिरसगावकसबा ठाण्यात नोंदविली. पोलिसांनी संशयित आरोपी धनराज वरखडेविरुद्ध विनयभंगासह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले.

पत्नीची छेडखानी, पतीला मारहाण

रस्त्याने जाणाऱ्या विवाहितेला बघून दोन युवकांनी असभ्य भाषेचा वापर केला. पीडितेने त्याबद्दल जाब विचारला असता एकाने तिचा विनयभंग केला. पत्नीसोबत वाद होत असल्याचे बघून पीडितेच्या पतीने मध्यस्थी केली असता पतीसोबतही दोन्ही संशयितांनी झटापट केली. त्यात महिलेचा पती जखमी झाला. राजापेठ पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून विनयभंग व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. 

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com