esakal | ...अन् दंश झाल्यानंतर 'तो' साप घेऊनच पोहोचला दवाखान्यात, पाहा फोटो
sakal

बोलून बातमी शोधा

Snake

...अन् दंश झाल्यानंतर 'तो' साप घेऊनच पोहोचला दवाखान्यात, पाहा फोटो

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

घुग्घूस (चंद्रपूर ) : जिल्ह्यातील घुग्घूस (ghuggus chandrapur) येथील एका तरुणाला सर्पदंश झाला. सर्पदंश झाल्यानंतर कोणीही घाबरून उठून पळेल. मात्र, त्या तरुणाने चक्क सापाला सोबत घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्र (primary health center ghuggus) गाठले. इतकेच नाहीतर त्या रुग्णालयातून चंद्रपूरला रेफर केल्यानंतरही तो सापाला सोबत घेऊन रुग्णालयात दाखल झाला. त्यामुळे हा तरुण सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे.

अहमद सैय्यद, असे या तरुणाचे नाव असून तो घुग्घूस येथील रहिवासी आहे. त्याला काहीतरी काम करत असताना रविवारी दुपारच्या सुमारास सर्प दंश झाला. त्यानंतर तो सापासोबतच प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचला. पण, वैद्यकीय अधिकारी कर्तव्यावर हजर नव्हते. त्यामुळे आरोग्य केंद्रात अँटीवेनम उपलब्ध असतानाही लावण्यात आले नाही. त्यानंतर त्याला चंद्रपूरला रेफर करण्यात आले.

तरुण साप घेऊन दवाखान्यात पोहोचला.

तरुण साप घेऊन दवाखान्यात पोहोचला.

आरोग्य केंद्र आहे, पण डॉक्टरच नसतात -

प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. वाकदकर यांची बदली झाल्याने अजून त्यांच्या जागी डॉ. दामिनी शालीकराव थेरे (BAMS), श्रद्धा लक्ष्मण माडुरवार (BAMS ) यांची कंत्राटी पद्धतीने 09 सप्टेंबर रोजी घुग्घुस येथे नियुक्ती करण्यात आली. त्या अजून रुजू झाल्या नाही. घुग्घुस हा औद्योगिक शहर असून येथे मजुरवर्ग, शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. या आरोग्य केंद्राअंतर्गत जवळपास पंधरा गाव येतात. हजारो नागरिकांच्या उपचारासाठी MBBS वैद्यकीय अधिकाऱ्यांची गरज असताना याठिकाणी BAMS नियुक्त करण्यात आल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र घुगुस आकस्मिक रुग्णांची नियमित आवक लक्षात घेता या ठिकाणी 3 MBBS Dr ची पदस्थापना देण्यात आली आहे.

आज पर्यंत MBBS वैद्यकीय अधिकारी नियुक्त करण्यात आले. मात्र, पहिल्यांदाच दोन BAMS महिला वैद्यकीय अधिकारी नियुक्त झाल्याने परिसरात तर्क-वितर्काना उत आला असून सदर वैदकीय अधिकारी हे एका जिल्हास्तरीय राजकीय नेत्यांचे जवळचे असल्याने त्यांना हे संधी मिळाल्याची चर्चा आहे.

loading image
go to top