शिळी पोळी दिल्याने पत्नीला पेटविण्याचा प्रयत्न 

fire
fire

नागपूर : जेवनात शिळी पोळी दिल्याचा राग मनात धरून पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. शेजाऱ्यांनी वेळीच धाव घेतल्यामुळे महिलेचा जीव वाचला. तिच्यावर मेडिकलमध्ये उपचार सुरू आहे. या प्रकरणी पोलिसांनी पतीविरूद्ध गुन्हा दाखल करून अटक केली. सुनील प्रभाकर गोडमारे (वय 40, खापरी, पुनर्वसन सेक्‍टर, 26) असे आरोपीचे नाव आहे. 

प्रभाकर गोडमारे हे मोलमजुरी करतात. ते पत्नी मिनाक्षी, मुलगा आणि आईसह राहतो. ती धुणीभांडीचे काम करते. त्याला दारूचे व्यसन आहे. पत्नीचे कुण्यातरी युवकाशी अनैतिक संबंध असल्याचा संशय प्रभाकरला होता. त्यामुळे तो कोणत्याही कारणावरून पत्नीशी वाद घालून मारहाण करीत होता. शुक्रवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास प्रभाकर दारू पिऊन घरी आला. त्याने पत्नीला जेवन वाढायला सांगितले. स्वयंपाक झाला नसल्याने तिने थोडे थांबायला सांगितले. मात्र, त्याने शिवीगाळ करीत लगेच जेवण वाढून मागितले. त्यामुळे मिनाक्षी यांनी सकाळची शिळी पोळी प्रभाकरला दिली. "शिळी पोळी का दिली?' या कारणावरून प्रभाकरने तिला मारहाण करण्यास सुरूवात केली.

शेजारच्या एका युवकासोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप करीत तिला बेडरूममध्ये ओढत नेले. तिच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान त्याच्या आईने आरडाओरड केली. त्यामुळे वस्तीतील युवकांनी घराकडे धाव घेतली. तिला प्रभाकरच्या तावडीतून वाचविले. लगेच पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. बेलतरोडी पोलिस पोहचले. त्यांनी प्रभाकरविरूद्ध पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करून अटक केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com