अकोल्याच्या मंगेशने केली नागरिकांची ट्रॅफीक जॅमपासून सुटका

mangesh
mangesh

अकोला : बकरी ईद आणि रविवारनंतर चारकमान्यांच्या कामाचा सोमवारचा दिवस. प्रत्येकाची सकाळी कामकाजाकरीता जाण्याची प्रत्येकाची धडपड. मात्र, रतनलाल प्लॉट चौकात सकाळी 10 ते 11.30 वाजेपर्यंत मोठा ट्रॅफीक जॅम लागला. अनेक वाहनांसोबत विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक यामध्ये अडकून होते. वाहतूक शाखेचे पोलिस नसल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप झाला. मात्र, आपले सामाजिक भान कायम ठेवत मंगरुळपीर येथील युवकांने मोठ्या शिताफीने परिस्थिती सांभाळली. प्रत्येक वाहनधारकाला विनंती करित त्याने तब्बल दिड तासानंतर नागरिकांना या वाहतुकीचा गुंता सोडविला.

मुळचा मंगरुळपीर येथील मंगेश सोळंके काही कामानिमित्त अकोला शहरात आला. रतनलाल प्लॉटमध्ये खुप मोठा जॅम त्याने पाहिला. मोठ्या गाड्या, दुचाकी, ट्रॅक्टरसह अनेक नागरिक या जॅममध्ये अडकले होते. सामाजिक दायीत्वाच्या भावनेतून प्रत्येक वाहनधारकाला तो विनंती करू लागला. तास-दिडतास त्याने वाहतुक पोलिसाची भूमिका पार पाडत मोठ्या शिताफीने या समस्येवर नियंत्रण मिळविले.

वाहनांची गर्दी
रतनलाल प्लॉटपासून ते चौधरी विद्यालयापर्यंत, नेकलेस रोडवर रघुवंशी मंगलकार्यालयापर्यंत, उमरी रोडवरील राठी पेडेवाल्यापर्यंत तर दुर्गाचौकाकडे महावितरण कार्यालयापर्यंत वाहने अडकून पडली होती.

सिग्नल असून नसून एकच
रतनलाल प्लॉट येथे वारंवार वाहतुकीची समस्या निर्माण होत आहे. याठिकाणी सिग्नल व्यवस्था असूनही वाहनधारक पालन करताना दिसून येत नाहीत.

वाहतुक पोलिस हवाच
वारंवार निर्माण होणाऱ्या वाहतूकीच्या समस्येवर नियंत्रण मिळविण्याकरीता वाहतुक शाखेकडून उपाययोजना होत नसल्याचे नागरिकांनी सांगितले. एक तरी कर्मचारी असला तर वारंवार अशी परिस्थिती निर्माण होणार नाही.

वर्दळीचा मार्ग
शहरातील मोठी दवाखाने, शैक्षणिक संस्था, कार्यालयांचा रस्ता तसेच मोठी उमरी मार्गे दहिगाव पळसोकडे जाणार हा मार्ग असल्याने या चौकात नेहमीच गर्दी असते. ग्रामीण भागात जाणारी एसटी, बांधकाम साहित्याचे ट्रक यासह मोठ्या गाड्या या मार्गाने नेहमी असतात.

सिग्नल असूनही येथे पोलिस कर्मचारी नसल्याने वातुकीचा खोळंबा झाला. नागरिकांचे मोठ्याप्रमाणात हात होत आहेत. वारंवार होणाऱ्या ट्रॅफीक जॅमवर पर्याय शोधने गरजेचे झाले आहे. नागरिकांच्या समस्या पाहून मला स्वतः रहावल्या गेलं नसल्याने मी नागरिकांची मदत करित होतो.
- मंगेश दिनकर सोळंके, युवक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com