वयाच्या चाळीशीत बागडेंची सुवर्ण बाजी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 मार्च 2018

मनाेज बागडे यांची कारकिर्द
आय.बी.बी.एफ.एफ. (मास्टर) मिस्टर इंडिया - २०१७ पूणे स्पर्धेत त्यांनी ५ वा क्रमांक. आय.बी.बी. एफ. (मास्टर) मिस्टर इंडिया - २०१८ मध्ये चौथा क्रमांक मिळवला. विदर्भ बॉडी बिल्डींग तसेच अकाेला बॉडी बिल्डींग अॅन्ड फिटनेस असाेसिएशन यांच्या जिल्हास्तरीय स्पर्धेत ‘जगदंब श्री - २०१७’, ‘अकाेला श्री-२०१८, ‘आय.एस.क्लासिक २०१८’ व ‘लहू श्री २०१८’ या शरीर

अकाेला : वयाच्या चाळीशीत २० किलाे वजन कमी करुन भारतीय नागरी शरीर सौष्ठव स्पर्धेत (मिस्टर इंडिया) देशातून प्रथम क्रमांक पटकावून अकाेल्याचे मनाेज भिमराव बागडे यांनी सुवर्ण बाजी मारली. ते सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी असून, सुवर्ण पदक पटकावणारे एकमेव खेळाडू ठरले आहेत.

यासंदर्भात शुक्रवारी (ता.३०) शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी तरुण बगेरे यांनी ही माहिती दिली. मनाेज भिमराव बागडे (४४) हे अकाेला सार्वजनिक बांधकाम विभागात आरेखक या पदावर कार्यरत आहे. त्यांनी आपल्या बॉडी बिल्डींगची सुरुवात १९९६-९७ पासून केली. तीन वर्षात त्यांनी ‘कामगार श्री’, ‘अभिमन्यु श्री’ चा बहुमान मिळवला. बॉडी बिल्डींग क्षेत्रात प्रथमतः त्यांना आय.बी.बी.एफ.चे राष्ट्रीय जज मिलींद डाेंगरे यांनी बॉडी बिल्डींग क्षेत्रात आणले. परंतू, सन १९९९ पासून जवळपास १५ वर्ष त्यांनी बॉडी बिल्डींगच्या सरावास विश्रांती दिली.

दरम्यानच्या काळात कार्यालयीन व्यस्तता व पारिवारीक आणि सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडत असताना बागडे यांचे वजन ८५ किलाे झाले हाेते. या विश्रांतीनंतर २०१३ पासून मनाेज बागडे यांनी बॉडी बिल्डींगमध्ये पुन्हा आगमन केले. तब्बल पाच वर्षांच्या परिश्रमानंतर त्यांनी नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय नागरी सेवा शरीर सौष्ठव स्पर्धेत (मिस्टर इंडिया) महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केले. स्पर्धेत त्यांनी उत्कृष्ठ कामगीरी बजावत प्रथम कमांक पटकावून सुवर्ष पदक मिळवले. बॉडी बिल्डींग क्षेत्रात मिळालेल्या सुवर्ण पदकाचे श्रेय त्यांनी त्यांचे काेच धिरज घरडे, आहार तज्ज्ञ डॉ. प्रदीप ताेष्णीवाल यांना दिले. स्पर्धेत भाग घेण्यासाठी सार्वजनिक विभागाचे कार्यकारी अभियंता मिथलेश चौहाण यांनी याेगदान दिले. त्याच प्रमाणे या स्पर्धेसाठी अनिल काळे, सुधाकर खुमकर, तरुण बगेरे, धनंजय गावंडे, बबन नेरकर, तसेच गौरव बागडे, आंचल बागडे यांनी प्राेत्साहन दिल्याचे त्यांनी सांगितले.

मनाेज बागडे यांची कारकिर्द
आय.बी.बी.एफ.एफ. (मास्टर) मिस्टर इंडिया - २०१७ पूणे स्पर्धेत त्यांनी ५ वा क्रमांक. आय.बी.बी. एफ. (मास्टर) मिस्टर इंडिया - २०१८ मध्ये चौथा क्रमांक मिळवला. विदर्भ बॉडी बिल्डींग तसेच अकाेला बॉडी बिल्डींग अॅन्ड फिटनेस असाेसिएशन यांच्या जिल्हास्तरीय स्पर्धेत ‘जगदंब श्री - २०१७’, ‘अकाेला श्री-२०१८, ‘आय.एस.क्लासिक २०१८’ व ‘लहू श्री २०१८’ या शरीर सौष्ठव स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतिय क्रमांक पटकाविला आहे.

शरीर सौष्ठव बनविण्यासाठी वयाची गरज नसून, सरावाची गरज आहे. आराेग्या पेक्षा काेणती माेठी धनसंपदा नाही.
- मनाेज बागडे, सुवर्ण पदक विजेता, अ.भा. नागरी सेवा शरीर सौष्ठव स्पर्धा

Web Title: Manoj Bagde body building in Akola