हातावर होम क्वारंटाइनचे शिक्के मारताय...अनेकांना शाईची ऍलर्जी

file photo
file photo

यवतमाळ : बाहेर जिल्ह्यातून किंवा परराज्यातून शहरात, गावात आलेल्या नागरिकांना होम क्वारंटाइन करण्यात येते. त्याची ओळख पटावी, त्यांना बाहेर फिरता येऊ नये, म्हणून त्यांच्या हातावर होम क्वारंटाइनचा शिक्का मारला जातो. मात्र, काही जणांना शिक्‍क्‍याच्या शाईची ऍलर्जी झाल्याचा प्रकार यवतमाळ तालुक्‍यात उघडकीस आला आहे.

कोरोना संसर्गामुळे लॉकडाउन 4.0 संपण्याच्या मार्गावर आहे. मात्र, अजूनही कोरोना आटोक्‍यात आलेला नाही. कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी अत्यंत महत्त्वाच्या कामाशिवाय बाहेर फिरू नये, अशा प्रशासनाच्या सूचना आहेत. मात्र, यानंतरही नागरिकांची गर्दी होत आहे.

मुंबई कनेक्‍शन असलेले अनेकांचे अहवाल पॉझिटिव्ह

सध्या परजिल्ह्यातून तसेच इतर जिल्ह्यातून दाखल झालेल्यांची संख्या मोठी आहे. मुंबई कनेक्‍शन असलेले अनेकांचे अहवाल पॉझिटिव्ह येत आहेत. यामुळे चिंता वाढली आहे. इतर ठिकाणावरून आलेल्यांना 14 दिवस होम क्वारंटाइन राहणे शासनाने बंधनकारक केले आहे.

आरोग्य विभागाने काळजी घ्यावी

अनेक जण मुक्तपणे संचार करीत असल्याचीही उदाहरणे आहेत. यामुळे बाहेरून आलेल्यांच्या हातांवर होम क्वारंटाइनचे शिक्के मारले जात आहेत. मात्र, शाईमुळे अनेकांना ऍलर्जी झाल्याचे समोर येत आहे. विशेषत: यवतमाळ तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात हा प्रकार समोर आला आहे. आरोग्य विभागाने शिक्के मारताना काळजी घेतली नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. शाईची ऍलर्जी झाल्याने अनेकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. यामुळे आता शिक्का मारायचा की नाही? असा प्रश्‍न नागरिकांसमोर येत आहे.

शाई बदलविली
होम क्वारंटाइनचे शिक्के मारलेल्या नागरिकांपैकी काहींना ऍलर्जीसारखे झाले आहे. यामुळे आम्ही शाई बदलण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या शाईने आता शिक्के मारले जात आहेत.
- सुषमा खोडवे, तालुका वैद्यकीय अधिकारी, यवतमाळ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com