एटापल्ली : माओवाद्यांची पोस्टर, बॅनर आढळले

मनोहर बोरकर
शनिवार, 22 सप्टेंबर 2018

बॅनर व पोस्टरमध्ये 21 ते 27 सप्टेंबर दरम्यान माओवादी पार्टीचा स्थापना दिवस सप्ताह साजरा करून जनसंघर्ष तीव्र करण्याचे आव्हान करण्यात आले आहे. सुरजागड लोहखनीज पहाड़ी परिसराला केंद्रीय राखीव पोलिस दल व जिल्हा पोलिस दलाचे कड़क संरक्षण कवच असून हेडरी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय पासून एक किमी अंतरावर सदर बॅनर पोस्टर आढळून आल्याने नागरिकांमध्ये कमालीची दहशत पसरली आहे.

एटापल्ली : तालुक्यातील वादग्रस्त सुरजागड लोहखनीज पहाड़ी परिसरातील मुख्य रस्त्यावर माओवाद्यांनी पोस्टर व बॅनर लावून पार्टी स्थापनेचा चौदावा वर्धापन दिवस उत्साहात साजरा करण्याचे आव्हान जनतेला करण्यात आले आहे.

बॅनर व पोस्टरमध्ये 21 ते 27 सप्टेंबर दरम्यान माओवादी पार्टीचा स्थापना दिवस सप्ताह साजरा करून जनसंघर्ष तीव्र करण्याचे आव्हान करण्यात आले आहे. सुरजागड लोहखनीज पहाड़ी परिसराला केंद्रीय राखीव पोलिस दल व जिल्हा पोलिस दलाचे कड़क संरक्षण कवच असून हेडरी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय पासून एक किमी अंतरावर सदर बॅनर पोस्टर आढळून आल्याने नागरिकांमध्ये कमालीची दहशत पसरली आहे.

सदर बॅनर (ता. 20) गुरुवारी सकाळी दरम्यान नागरिकांना निदर्शनात आले. शासनाकडून नागरिकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध युद्ध उभारावे असेही बॅनरमध्ये मजकूर लिहिला आहे. गेले काही दिवस माघारलेले नक्षल चळवळ पोस्टर बॅनरच्या माध्यमाने डोकेवर काढत असल्याचे दिसून येते. त्यामुळे पोलिस प्रशासन दक्ष असून नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. सदर बॅनर व पोस्टरमध्ये भारतीय कम्युनिस्ट पार्टी माओवादी असा उल्लेख केला आहे.

Web Title: maoist poster banner found in Gadchiroli