गडचिरोलीत झाडे आडवी टाकून माओवाद्यांनी अडविला रस्ता 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

भामरागड-कोठी मार्गावरील हलवेर व कियर गावादरम्यान माओवाद्यांनी मंगळवारी (ता. 22) रात्रीच्या सुमारास झाडे आडवी टाकून ठेवली होती.

गडचिरोली - जिल्ह्याच्या भामरागड तालुक्‍यातील भामरागड-कोठी मार्ग माओवाद्यांनी झाडे टाकून अडविला. त्यामुळे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

भामरागड-कोठी मार्गावरील हलवेर व कियर गावादरम्यान माओवाद्यांनी मंगळवारी (ता. 22) रात्रीच्या सुमारास झाडे आडवी टाकून ठेवली होती. त्यामुळे मंगळवारी अहेरी येथून कोठी येथे गेलेली बस बुधवारी (ता. 23) सकाळी परतीच्या प्रवासात पुन्हा माघारी फिरली. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. घटनास्थळी माओवाद्यांनी काही पत्रकेही टाकली आहेत. 22 एप्रिल रोजी कसनासूर जंगलात ठार झालेल्या 40 माओवाद्यांमध्ये काही निरपराध नागरिक असल्याचा दावा माओवाद्यांनी या पत्रकांमध्ये केला असून, त्या घटनेचा निषेध केला आहे. कसनासूरचा हादरा बसल्यानंतर चवताळलेले माओवादी पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Maoists blocked the road in Gadchiroli

टॅग्स