सकल मराठा समाजाचे आमदारांच्या घरासमोर धरणे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

खामगाव : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज सकल मराठा समाजाच्या वतीने भाजपचे आमदार ऍड. आकाश फुंडकर यांच्या घरासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

खामगाव : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज सकल मराठा समाजाच्या वतीने भाजपचे आमदार ऍड. आकाश फुंडकर यांच्या घरासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

सकल मराठा समाजाने आज राज्यभर आमदार, खासदार यांच्या घरासमोर धरणे आंदोलने आयोजित केले होते. त्यास खामगाव येथे सुद्धा चांगला प्रतिसाद मिळाला. भाजपचे आमदार ऍड. फुंडकर यांच्या घरासमोर धरणे देत घोषणाबाजी करण्यात आली. "आमदार साहेब चुप्पी छोडो, विधानसभा मे कुछ तो बोलो" यासह विविध घोषणा यावेळी देण्यात आल्या. मराठा समाजाच्या मागण्यांचे निवेदन देवून आंदोलनाचा समारोप करण्यात आला. आंदोलन शांततेत पार पडले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटिल, ठाणेदार संतोष ताले यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी  बंदोबस्त ठेवला.

Web Title: maratha kranti morcha agitation behind MLA home