मराठा आरक्षणासाठी अकोला बंद, विशाल मोटारसायकल रॅलीने वेधले लक्ष

विवेक मेतकर
बुधवार, 25 जुलै 2018

अकोला : मराठा आरक्षण तातडीने देण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने बुधवार (ता. 25) रोजी शहरासह जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आलेे. या आवाहनास अकोला प्रतिसाद देत जिल्ह्यातील तालुक्याची शहरे व मोठ्या गावांमध्ये व्यापारी प्रतिष्ठाने, शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्यात आली.

काही ठिकाणी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी रास्ता-रोको आंदोलन केले. तर राष्ट्रीय महामार्गावर कार्यकर्त्यांनी टायर पेटवून वाहतुक अवरुद्ध करण्याचा प्रयत्न केला. सकल मराठा समाज अकोला जिल्हा शाखेच्या कार्यकर्त्यांनी सकाळी अकोला शहरातून मोटारसायकल रॅली काढून बंद पाळण्याचे आवाहन केले. शहरातील पवत्राल पंप दुपारपर्यंत बंद होते.  नेहमीच्या शिस्तीत या मोर्चाचे आयोजन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी केलेल्या ‘एक मराठा-लाख मराठा’, ‘जय शिवाजी-जय भवानी’च्या जयघोषाने शहर दणाणून गेले होते. दरम्यान, परिवहन यंत्रणेवर बंदचा परिणाम दिसून आला नाही. बहुतांश मार्गांवरील बसगाड्या सुरु असल्याचे दिसून आले. जिल्ह्यातील युवकांचा मोठ्या संख्येने सहभाग दिसून आला.

Web Title: maratha kranti morcha bike rally at akola