Maratha Kranti Morcha : असा कसा देत नाही, घेतल्या शिवाय राहत नाही!

विवेक मेतकर
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

अकोला : 'अरे, असा कसा  देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही' अशा घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून शहराच्या वेगवेगळ्या भागात दुचाकी रॅली काढत, ठिय्या आंदोलन करत मराठा बांधवांनी मराठा आरक्षणाकडे लक्ष वेधून घेतले.

मराठा समाजाला आरक्षण लागू करण्यात यावे या मागणीसाठी  मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने गुरुवारी अकोला बंदला सुरुवात झाली. काही ठिकाणी रस्त्यांवर टायर पेटवून शहरात येणारे रस्ते बंद करण्यात आले आहेत. तर काही ठिकाणी बॅरिकेट्स लावून रस्ते बंद करण्यात आले आहेत. या आंदोलनात तरुणाई मोठया संख्येने सहभागी झाली आहे. आम्हाला आरक्षण कशी मिळणार, अशा घोषणा देताना ती दिसत आहे.

दरम्यान, शहरात अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सर्व वरिष्ठ पोलिस अधिकारी बंदोबस्तासाठी रस्त्यावर उतरले आहेत. मात्र, कुठल्याही प्रकारची अनुचित घटना होणार नाही याची काळजी घेतली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय येथून या रॅलीचा प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर पंचायत समीती, गांधी रोड, सिटी कोतवाली, तिळक रोड, कपडा मार्केट, टॉवर चौक, अग्रसेन चौक, रेल्वेस्टेशन, सातव चौक, जठारापेठ, रतनलाल प्लॉट, सिव्हील लॉन, अशोक वाटिका मार्गे रॅली जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचली. यावेळी या ठिकाणी ठिय्या देण्यात आला. तसेच मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी यशोचित मनोगते व्यक्त केली. राष्ट्रगिताने या कडकडीत बंदचा समारोप करण्यात आला. दरम्यान शहरातील विविध व्यापारी प्रतिष्ठाने, दुकाने, शाळा, महाविद्यालय बंद ठेवून कडकडीत बंदला उत्फुर्त बंद पाळण्यात आला. यामध्ये तालुकास्तरावरही याच पद्धतीने तहसील कार्यालयासमोर शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात आले.

20 वीरांना सामुहिक श्रध्दांजली

ऑरंगाबाद येथे झालेल्या राज्यव्यापी बैठकीमध्ये मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या 20 वीरांना सामुहिक श्रध्दांजली वाहण्याकरीता महाराष्ट्र कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय राज्यातील समन्वयकांनी घेतला. त्याअनुषंगाने मराठा अकोला बंदमध्ये करण्यात आलेल्या ठिय्यामध्ये त्या 20 वीरांना सामुहिक श्रध्दांजली देण्यात आली.

पोलिसांचा तगडा बंदोबस्त

मराठा आरक्षणासह विविध मागण्याकरीता रस्त्यावर शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याकरीता उतरलेल्या आंदोलनाच्या बंदोबस्ताकरीता पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. शहरातील प्रत्येक चौकाचौकामध्ये पोलिसांचे ताफे दिसून येत होते. कुठल्याही प्रकारचा अनुचीत प्रकार घडू नये याची काळजी पोलिसांकडून घेण्यात येत होती.

जिल्हाभरातील शाळा, महाविद्यालय बंद

मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील धग कायम ठेवण्यासाठी सकल मराठा समाजाच्यावतीने जिल्हाभर कडकडीत बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याअनुषंगाने तालुकासह जिल्हाभरातील व्यापारी प्रतिष्ठाने, शाळा, महाविद्यालय कडकडीत बंद होते. कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने प्राथमिक, माध्यमिक, कनिष्ठ, महाविद्यालय बंद ठेवण्याबाबत अधिकृत आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते.

विविध संघटनांचा बंदला प्रतिसाद

मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरीता जिल्हाभर कडकडीत बंद पाळण्यात येत असल्याने विविध समाजाच्या संघटनांनी बंदला प्रतिसाद दिला आहे. यामध्ये मुस्लीम समाजानेही या बंदमध्ये सहभाग नोंदविला होता.

Web Title: Maratha Kranti Morcha : maratha agitation in akola