नागपुरात निःशब्द विराट मराठा मूक मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 ऑक्टोबर 2016

नागपूर : कोणताही निषेध वा विरोध न करता मराठा समाजातर्फे आज नागपुरात मराठा मूक मोर्चा निघाला. सकल मराठा समाजातर्फे काढण्यात आलेल्या मोर्चात उत्स्फूर्तपणे हजारो लोक सामील झाले होते. नागपुरात यापूर्वी अनेक मोठे मोर्चे निघाले; परंतु आजचा मोर्चा वेगळा होता, अलग होता.

रेशिमबाग मैदानातून निघालेला हा शिस्तबद्ध व निःशब्द मोर्चाचा समारोप कस्तुरचंद पार्कवर दुपारी साडेतीन वाजता झाला. रेशिमबागपासून निघालेल्या या मोर्चाची लांबी जवळपास अडीच किलोमीटर एवढी होती. यात महिलांचा सहभाग लक्षणीय होता. हात भगवा व अंगात काळे टी शर्ट व डोक्‍यावर भगवी टोपी घातलेले युवक अत्यंत शांतपणे मोर्चात चालत होते.

सकाळी 10 वाजेपासूनच रेशिमबाग मैदानावर मोर्चात सामील होणाऱ्या लोकांची गर्दी सुरू झाली होती. दुपारी 12 वाजताच्या सुमारास रेशिमबाग मैदानातून मोर्चा निघाला. मोर्चाचे पहिले टोक आग्याराम देवी मंदिराजवळ पोचले तेव्हा रेशिमबाग मैदानावर शेवटचे टोक होते. हे अंतर जवळपास दोन ते अडीच किलोमीटर एवढे आहे. रेशिमबागेतून निघालेला हा मोर्चा तुळशीबाग, उपाध्ये मार्ग, नरसिंग टॉकीज, गांधीगेट, टिळक पुतळा, गांधीसागर तलाव, सुभाष मार्ग, लोहा पूल, मॉरिसकॉलेज टी पॉईंट व संविधान चौकातून कस्तुरचंद पार्कवर गेला.

कोणत्याही घोषणा न देणाऱ्या मोर्चेकऱ्यांच्या हातात "मराठा समाजाला आरक्षण मिळालेच', "कोपर्डी घटनेचा निषेध' असे फलक मात्र हातात होते. बहुसंख्य महिलांनी काळ्या रंगाच्या साड्या घातल्या होत्या, तर युवक-युवतींनी काळे टी शर्ट घातले होते. कस्तुरचंद पार्कवर मोर्चाचा समारोप झाल्यानंतर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांना देण्यात आले. यात मराठा आरक्षण लागू करावे, कोपर्डी घटनेची योग्य चौकशी करून आरोपींना शिक्षा द्यावी, या मागण्या प्रामुख्याने करण्यात आल्या.

. . . . . .

Web Title: Maratha Kranti Morcha in Nagpur