#MarathaKrantiMorcha परभणी जिल्ह्यात कडकडीत बंद..

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जुलै 2018

गंगाखेड, पाथरी, सोनपेठ, पूर्णा येथे प्रतिसाद

गंगाखेड -  मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या गंगाखेड बंदला काल (ता.२३) येथे हिंसक वळण लागले होते. औरंगाबादला काल याच मागणीसाठी तरूणाने घेतलेल्या जलसमाधीनंतर आज क्रांती मोर्चातर्फे पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला आज पुन्हा गंगाखेडबरोबरच जिल्ह्यातील पूर्णा, सोनपेठ, पाथरी या तालुक्यात सकाळपासून मोठा प्रतिसाद मिळत आहे.

गंगाखेड आगरातून आज सकाळी जाणा-या आठ बस साडे सहा वाजेपर्यंत सुटल्या नव्हत्या. त्यामुळे प्रवाशांना बसस्थानकातून परत फिरावे लागले. आगर व्यवस्थापनाने महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर बस सोडण्यात आल्या नसल्याचे सांगितले. सोनपेठ, नाशिक, लातूर, औरंगाबाद, माळेगाव, बोर्डा, अहमदपूर, पुणे या गांवाना जाणा-या बस येथील बस आगारातच थाबल्या होत्या.

पाथरी आगारातूनही आज एकही बस सोडण्यात आली नाही. या बंदमुळे प्रवाशांना खाजगी वाहनाचा सहारा घ्यावा लागला. पूर्णा तालुक्यात पूर्णा नांदेड मार्गावर चुडावा येथे आज सकाळीच रास्तारोको सुरू चुडावा गावही बंद होते.

Web Title: #MarathaKrantiMorcha band to in Parbhani district