#MarathaKrantiMorcha मुंडन करून सरकारचा निषेध

shegaon
shegaon

शेगाव - मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाचा चक्का जाम व मुंडन करून सरकारचा निषेध करण्यात आला मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशा लक्षवेधी घोषणा करून सरकार विरोधी निषेध नोंदवून मुंडन आंदोलन छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठिया आंदोलन करण्यात आला.

आरक्षणाच्या मागणीसाठी आकोट-तेल्हारा रोडवरील उड्डानपुला जवळ रास्तारोको ठिय्या आंदोलन सुरू झाले होते. त्यानंतर आंदोलकांनी गजानन महाराज मंदिर रोड वरील गांधी चौकात टायर जाळुन नारेबाजी केली यावेळी त्यांची या ठिकाणी तैनात तैनात पोलिसांसोबत वादावादी झाली रोडवर मराठा मोर्चाच्या आंदोलकांनी सकाळ पासुनच प्रतिष्ठाने शाळा महाविद्यालय बंद करण्याचे आवाहन केले होते आज मंगळवार आठवड़ी बाजार असल्याने ग्रामीण भागातुन येणाऱ्या नागरिकांना बंदचा फटका सहन करावा लागला वृत्त लिहिस्तोवर मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com