#MarathaKrantiMorcha वाशीम जिल्ह्यात आरक्षण आंदोलन पेटले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जुलै 2018

मराठा आरक्षण आंदोलनात काकासाहेब शिंदे या युवकाच्या मृत्यूप्रकरणी वाशीम जिल्ह्यात सकल मराठा समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. वाशीम, मालेगाव, रिसोड शहरात कडकडीत बंद पाळून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध करण्यात आला. रिसोडमध्ये मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळण्यात आला. 

वाशीम: मराठा आरक्षण आंदोलनात काकासाहेब शिंदे या युवकाच्या मृत्यूप्रकरणी वाशीम जिल्ह्यात सकल मराठा समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. वाशीम, मालेगाव, रिसोड शहरात कडकडीत बंद पाळून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध करण्यात आला. रिसोडमध्ये मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळण्यात आला. 

मराठा आरक्षण आंदोलनात काकासाहेब शिंदे या युवकाच्या मृत्यू प्रकरणी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या मराठा समाजाला बदनाम करण्याच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी जिल्ह्यात सकल मराठा समाज आज रस्त्यावर उतरला होता. वाशीम येथे पुसद नाका चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. शहरात कडकडीत बंद पाळून मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांचा निषेध करण्यात आला. रिसोड शहरात प्रचंड संख्येने निदर्शने करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला.

मालेगाव येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. मोहजा फाट्यावरही चक्काजाम आंदोलन करण्यात आले. वाशीम शहरातील अनेक शाळांना सुट्ट्या देण्यात आल्या. मात्र, कोठेही कसलाही अनुचित प्रकार घडला नाही.

Web Title: MarathaKrantiMorcha Reservation agitation in Washim district