दहावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 जून 2017

एटापल्ली (जिल्हा गडचिरोली) - दहावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याने एका विद्यार्थ्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला असून यामध्ये विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

एटापल्ली (जिल्हा गडचिरोली) - दहावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याने एका विद्यार्थ्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला असून यामध्ये विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

जिल्हा परिषद हायस्कूल गडचिरोली येथे शिकत असलेला अशमक उर्फ पिंटू भाऊराव बोरकर (वय 16) (रा. पोलिस संकुल गडचिरोली) या विद्यार्थ्याने दहावी परीक्षत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले. त्यामुळे त्याने मंगळवारी चार मजली इमारतीवरुन उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. यात त्याचे दोन्ही पाय व कंबरेल जबर मार लागून गंभीर जखमी अवस्थेत त्याला गडचिरोली येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पिंटूने मंगळवारी ऑनलाईन निकल पाहिल्यानंतर तो दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घरून बेपत्ता झाला. मुलगा उशिरापर्यंत घरी परत न आल्याने नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला. दरम्यान तो शिकत असलेल्या शाळेच्या चार मजली इमारतीवरुन उडी घेऊन त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. यात त्याचे दोन्ही पाय व कंबरेल जबर मार लागला. तो रात्रभर शाळा परिसरात पडून होता. आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास रस्त्याने जाणाऱ्या पादचाऱ्यांना त्याची हाक ऐकू गेली. "पाणी-पाणी', असे आवाज अशमक देत होता. नागरिकांनी पोलिसांना माहिती देऊन पिंटूला तातडीने डॉ. कुंभारे यांच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर पुढील उपचार सुरु आहेत.

Web Title: marathi nes ssc result suicide attempt gadchiroli news maharashtra news