जागतिक महिला दिनी महिला, मुलींनी घडविला विश्वविक्रम!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 मार्च 2018

8318 महिला, मुलींनी मानवी साखळीतून 'बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियान'चा लोगो साकारला.

अकोला - जागतिक महिला दिनी जगभर महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव, सन्मान होत असताना वाशीम जिल्ह्यातील महिला, मुलींनी एकत्र येत या दिवशी अनोखा विश्वविक्रम केला अाहे. आंतरराष्ट्रीय महिलादिनी विश्वविक्रम घडवित जिल्ह्याचे नाव जागतिक स्तरावर पोहचवले. वाशीम जिल्हा प्रशासनाने आयोजित केलेल्या उपक्रमात सहभागी होत 8318 महिला, मुलींनी मानवी साखळीतून 'बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियान'चा लोगो साकारला. अाजच्या तारखेचे 
औचित्य साधून 8318 महिलांनी एकत्र येत स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी जनजागृती करणे हा या उपक्रमाचा उद्देश होता. 

Web Title: marathi news akola womens day record save girl world record