मार्चअखेरीस बॅंका सलग चार दिवस बंद 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 मार्च 2018

नागपूर - मार्च महिन्याच्या अखेरीस सलग चार सुट्या आल्याने बॅंकेचे व्यवहार चार दिवस बंद राहणार आहेत. २९ मार्च ते १ एप्रिल अशा चार दिवस बॅंकांना सुट्या आल्या आहेत. 

२९ मार्चला महावीर जयंती, ३० मार्चला गुड फ्रायडे, ३१ मार्चला बॅंकांची वर्ष अखेरची आणि एक एप्रिलला रविवार आहे. यामुळे सलग चार दिवस सुट्या बॅंकांना राहणार आहेत. या चार दिवसांमध्ये बॅंकांचे दैनंदिन व्यवहार बंद असणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना बॅंकेचे व्यवहार करणे शक्‍य होणार नाही. ग्राहकांनी बॅंकेचे महत्त्वाची कामे करायची असल्यास मार्चच्या अखेरची वाट पाहू नये. तातडीने कामे करावी लागणार आहेत.

Web Title: marathi news bank closed for four consecutive days at the end of March

टॅग्स