गारपिटीने शेतमजुर जखमी

पंजाबराव ठाकरे
रविवार, 11 फेब्रुवारी 2018

संग्रामपुर - तालुक्यात गारपिटीमुळे पिकांचे नुकसान झालेच. पण सहा मजूर जखमी झाल्याची घटना आज (ता. 11 फेब्रुवारी) घडली. तालुक्यात अचानक गारांचा पाऊस सुरु झाल्याने लाडनापुर परिसरात शेतात काम करणारे बरेच शेतमजुर जखमी झाले. विठ्ठल अगडते या तरुणाच्या पाठीवर गारांचा मार लागल्याने पूर्ण सुज आली. काहींचे डोके फुटले. संत्रा, गहु, कांदा, हरभरा,  भाजीपाला सह शेती पिके नेस्तनाबूत झाली. लाडनापुर परीसरात जवळपास 500 ग्रॅम वजनाची गार पडल्याने नागरिक सैरभैर झाले होते.

Web Title: marathi news budana hailstorm crop damage

टॅग्स