एसटी बसने विद्यार्थीनीस चिरडले; बस पेटविण्याचा प्रयत्न

accident
accident

मलकापूर : एस.टी.चालकाने निष्काळजीपणे एस.टी.बस वळविल्याने ११ वर्षीय विद्यार्थीनी पाठीमागील चाकाखाली चिरडल्या गेल्याची घटना आज सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास नरवेल बस स्थानकावर घडली.

संजना गजानन लोणे (वय ११) सकाळी धरणगाव येथील शाळेत जाण्याकरीता नरवेल बस स्थानकावर बसची वाट पाहत उभी होती. दरम्यान बस क्र.एम.एच.२० डी-९३७८ या क्रमांकाच्या चालकाने भरधाव वेगात व निष्काळजीपणाने बस चालवून बस टॉपच्या आवारात जोराने एसटी बसमागे वळविली असता संजना गजानन लोणे या विद्यार्थीनीच्या अंगावरून एस.टी. बसचे पाठीमागील चाक गेल्याने ती जागीच ठार झाली. या हृदयद्रावक घटनेने परिसरातील ग्रामस्थांमध्ये एकच संताप निर्माण होवून ग्रामस्थांनी बसची तोडफोड सुरू करीत बस खाली लाकडे टाकीत बस पेटवून देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान घटनास्थळी तातडीने दाखल झालेले दसरखेड एमआयडीसी पो.स्टे.चे पोलिस निरीक्षक माधवराव गरूड, पोकाँ. संजय निंबोळकर, आनंद माने व मोहनसिंग राजपूत यांनी जमावाला शांत करीत परिस्थिती नियंत्रणात आणली. याप्रसंगी उपविभागीय पोलिस अधिकारी गिरीष बोबडे हे सुध्दा घटनास्थळी दाखल झाले होते.

याप्रकरणी मृतक विद्यार्थीनीचे मामा विलास मुकींदा धाडे (वय ४८) रा.म्हैसवाडी यांनी याप्रकरणी दसरखेड एमआयडीसी पो.स्टे.ला फिर्याद दाखल करीत अपघातास कारणीभूत ठरलेल्या बस चालक संजय दिगंबर नारखेडे यांचेवर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com