जिजाऊ सृष्टीवर उसळणार जनसागर: योगेश पाटील

श्रीधर ढगे पाटील
गुरुवार, 11 जानेवारी 2018

येत्या १२ जानेवारी रोजी आंतरराष्ट्रीय स्तरावरील जिजाऊ जन्मोत्सव सोहळा मातृतीर्थ सिंदखेडराजा येथील जिजाऊ सृष्टीवर संपन्न होत असून या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले, छत्रपती बाबाजीराजे भोसले, छत्रपती संभाजीराजे भोसले व शिवश्री स्वप्नील खेडेकर सह माजी खासदार शिवश्री नाना पटोले, मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर, प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे, महासचिव मधुकर मेहेकरे मुख्य कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

नांदुरा (बुलडाणा) : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जिजाऊ माँसाहेबांच्या ४२० व्या जन्मोत्सव सोहळ्यासाठी सिंदखेडराजा नगरी सजली असून लाखोंच्या संख्येने येथे भाविक जमणार असल्यामुळे कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात पोहचली आहे. या सोहळ्यासाठी जिह्यासह नांदुरा तालुक्यातील शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष योगेश पाटील यांनी केले आहे.

येत्या १२ जानेवारी रोजी आंतरराष्ट्रीय स्तरावरील जिजाऊ जन्मोत्सव सोहळा मातृतीर्थ सिंदखेडराजा येथील जिजाऊ सृष्टीवर संपन्न होत असून या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले, छत्रपती बाबाजीराजे भोसले, छत्रपती संभाजीराजे भोसले व शिवश्री स्वप्नील खेडेकर सह माजी खासदार शिवश्री नाना पटोले, मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर, प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे, महासचिव मधुकर मेहेकरे मुख्य कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. यावेळी वेगवेगळ्या पुरस्काराचे वितरण होणार असून मराठा विधिभूषण पुरस्कार शिवश्री मिलिंद पवार, मराठा शिवशाहीर पुरस्कार शाहीर विजय तनपुरे तर मराठा उद्योगभूषण पुरस्कार संजय वायाळ याना देण्यात येणार आहे.

१२ जानेवारीला सकाळी ६ वा. महापूजा. स.७ वा. भव्य पालखीसह वारकरी दिंडी,९ वा. शिवधर्म ध्वजारोहण, ९ ते १ शाहिरांचे पोवाडे, सांस्कृतिक कार्यक्रम, विशेष सत्कार, प्रकाशन सोहळा, सामूहिक विवाह सोहळा व सप्तखंजेरिवादक सत्यपाल महाराजच्या किर्तनासह अनेक कार्यक्रमाची रेलचेल राहणार आहे. तरी या भव्यदिव्य कार्यक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी जिल्ह्यासह नांदुरा तालुक्यातील शिवप्रेमींनी मोठ्यासंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष योगेश पाटील यांनी केले आहे.

Web Title: Marathi news Buldhana news Jijau Jayanti