निलंबीत मुख्याध्यापकाच्या अलमारीत रेकार्ड सिलबंद

जितेंद्र सहारे
बुधवार, 6 डिसेंबर 2017

चिमूर पंचायत समीती अंतर्गत येणाऱ्या सोनेगाव (बेगडे ) येथील जिल्हा परीषद उच्च प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक जि. वाय. मुन यांच्या एककल्ली कारभाराविरोधात गावकरी एकत्रीत येऊन शाळा बहिष्काराचे हत्यार उपसल्याने शिक्षण विभागाने मुख्याध्यापक मुन यांना निलंबीत केले.

चिमूर : चिमूर नगर परीषद क्षेत्रातील सोनेगाव ( बेगडे) येथील जिल्हा परीषद उच्च प्राथमीक शाळेतील मुख्याध्यापक जि .वाय . मुन यांच्या आर्थिक अनियमीता विरोधात तक्रारी झाल्याने त्यांना ३ नोहेम्बंरला निलंबीत करण्यात आले मात्र एक महिना लोटूनही आजतागायत प्रभारी मुख्याध्यापकाकडे संपुर्ण प्रभार सुपुर्द केला नाही व निलंबित मुख्याध्यापकाच्या अलमारीतच रेकार्ड शिलबंद असल्याने शिव्यवृत्ती , शैक्षणिक सोयी सुविधा पासुन विद्यार्थी वंचित राहण्याची भिती पालंकात व्यक्त होत आहे.

चिमूर पंचायत समीती अंतर्गत येणाऱ्या सोनेगाव (बेगडे ) येथील जिल्हा परीषद उच्च प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक जि. वाय. मुन यांच्या एककल्ली कारभाराविरोधात गावकरी एकत्रीत येऊन शाळा बहिष्काराचे हत्यार उपसल्याने शिक्षण विभागाने मुख्याध्यापक मुन यांना निलंबीत केले. त्यांनी प्रभार शाळेतील प्रभारी मुख्याध्यापक चांदेकर यांचेकडे सोपविण्याचे आदेश असतानाही पुर्णता प्रभार सुपुर्द केलेला नाही. निलंबित झाल्यापासुन चारवेळा पत्नीच्या पुढाकारत येऊन दस्ताएवज हाताळले मात्र तीन रजिस्टर व्यतिरिक्त संपुर्ण प्रभार दिले नाही. याविषयी प्रभारी मुख्याध्यापक यांनी दोनदा व शाळा व्यवस्थान समीतीने एकदा गट शिक्षण अधिकाऱ्यांकडे लेखी माहीती दिली तरी विभागा कडून कोणतेही पाऊल उचलले नसल्याने शिक्षण विभाग साखर झोपेत असल्याची तीव्र प्रतिक्रिया पालंकात आहे.

शालेय संपुर्ण दस्ताएवज अलमारीत शिलबंध असल्याने शालेय प्रशासकीय कामे खोळंबली आहेत. शालेय बालक्रीडा स्पर्धा, सुवर्णमहोत्सवी शिष्यवृत्ती, निकाल, युडायस चे काम, विद्यार्थी गणवेश व इतर महत्वाची कामे थांबली आहेत. तसेच विज बिल भरले नसल्याने शाळेची विज खंडित करण्यात आलेली आहे. दोन दिवसात निलंबीत मुख्याध्यपकाने प्रभार सुपुर्द केला नाही तर शाळा व्यवस्थापन समीती तसेच संपुर्ण गावकरी शिक्षण विभागाच्या सुस्त कारभाराविरोधात आंदोलन करण्याच्या पावीत्र्यात असुन याची सर्वस्वी जबाबदारी शिक्षण विभागाची राहील अशी तीव्र प्रतीक्रीया शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांनी दिली.

Web Title: Marathi news Chandrapur news school issue