मुलीच्या अपहरणकर्त्याला अटक 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 मार्च 2018

नागपूर - चार वर्षांच्या मुलीचे दुचाकीवरून अपहरण करून तिला मेडिकल परिसरात सोडून पळ काढणाऱ्या आरोपीला लकडगंज पोलिसांनी अटक केली. खामदेव श्रीधर मेडुलकर (वय 38, रा. साईबाबानगर, खरबी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. 

महापालिकेच्या महाल झोन कार्यालयात सफाई कामगार असलेले अरुण सारवणे (रा. लकडापूल, हत्तीनाला) यांची मुलगी श्रद्धाचे आरोपीने दुचाकीवरून अपहरण केले होते. घटनेला जवळपास आठवडा उलटत असताना आरोपी सापडत नव्हता. शेवटी पीएसआय गाडेकर आणि हवालदार सुनील ठवकर यांनी खरबीकडे आरोपीचा शोध घेतला. आज दुपारी चार वाजता आरोपीला खरबी रोडवरून अटक केली. 

विकृत कृत्यासाठी अपहरण? 
आरोपी खामदेव मेंडुलकर हा रस्त्यावर दाढी-कटिंगचा व्यवसाय करतो. मात्र, मनपाच्या कारवाईत त्याचे दुकान उचलले गेले. तो मूळचा चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही येथील आहे. 15 वर्षांपासून नागपुरात व्यवसाय करतो. पत्नी व दोन मुलांसह खरबीत राहतो. तो विकृत असून, यापूर्वीही त्याला वस्तीत नागरिकांनी चोपल्याची माहिती आहे. त्यामुळे चिमुकलीशी विकृत कृत्य करण्यासाठी अपहरण केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्‍त केला आहे. 

Web Title: marathi news crime girls kidnapper arrested

टॅग्स