हिरव्या नागपूरवर कुऱ्हाड

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 मार्च 2018

नागपूर - नरेंद्रनगरात मुख्य रस्त्यांवर असलेले हिरवेगार शिसमचे झाड कापण्यात आले. कापलेले झाड महापालिकेच्या हिरव्या नागपूरवर कुऱ्हाड चालविण्यासा सारखे आहे. याप्रकरणी संबंधिताला महापालिकेच्या उद्यान विभागाकडून कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात येणार आहे.

महापालिका एकीकडे शहर हिरवे करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. पर्यावरणासाठी झाडांचे महत्त्व अधोरेखित करणारी जाहिरात, फलक लावून जनजागृती करण्यात येत आहे. मात्र, शहरातील नागरिकांनाच पर्यावरणाचे महत्त्व कळत नसल्याचे नरेंद्रनगरातील घटनेतून स्पष्ट झाले. नरेंद्रनगर येथील हनुमान मंदिर परिसरातील मुख्य रस्त्यावर शिसमचे २० वर्षे जुने हिरवेगार झाड होते. मात्र, या परिसरातील प्रकाश गोल्हर यांनी त्यावर कुऱ्हाड चालविली. झाड तोडण्यासाठी त्यांनी कुठलीही परवानगी घेण्याच्या नियमालाही हरताळ फासला.

परिसरातील काही नागरिकांनी महापालिकेच्या उद्यान विभागाकडे तक्रार केली. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला असून, गोल्हर यांना बुधवारी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याचे उद्यान निरीक्षक अमोल चौरपगार यांनी ‘सकाळ’सोबत बोलताना सांगितले.

Web Title: marathi news environment nagpur news tree