तेंदू पत्ता हंगाम सुरू होण्यापूर्वी जंगल जळून खाक; वनविभागाचे दुर्लक्ष 

नंदकिशोर वैरागडे 
गुरुवार, 8 मार्च 2018

तालुक्यात तेंदू पत्ता हंगामचे खुट कमाईचे काम सुरू होण्यापूर्वी वणव्याने रौद्र रूप धारण करून संपूर्ण जंगल आगीच्या खाईत गेले आहे. 

कोरची (गडचिरोली) - तालुक्यात तेंदू पत्ता हंगामचे खुट कमाईचे काम सुरू होण्यापूर्वी वणव्याने रौद्र रूप धारण करून संपूर्ण जंगल आगीच्या खाईत गेले आहे. वन विभागाकडून जंगलाचे आधीपासून नुकसान होऊ नये. यासाठी कुठल्याही प्रकारच्या उपाययोजना केल्याचे दिसून येत नसल्याने मौल्यवान वनस्पती सोबतच वन प्राणी चा सुरक्षेच्या दृष्टीने प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

ग्रामसभांना कोट्यवधीचा महसूल व मंजुराच्या हाताला काम देणाऱ्या तेंदूपत्ता हंगामाची नागरीक सर्वत्र वाट बघत असतात. तेंदू हंगाम तेंदूच्या झाडांची खुट कटाई करून चांगली पालवी यावी यासाठी दरवर्षी खुट कटाई केली जाते. ते होण्याआधीच रक्ताच्या कडेला असलेल्या पालापाचोळा वनविभाचे कर्मचारी जाडुन जंगल सुरक्षित राहावे. याकरीता जाडत असतात. वन विभागाने यावर्षी तो प्रकार या वन विभागात केल्याचे कुठेच दिसुन आले नाही, हे करीत असताना सर्व सोईयुक्त यंत्रणा सोबत असणे गरजेचे आहे. जोपर्यंत वणवा विझत नाही. तोपर्यंत त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वनमजुर कर्तव्यावर असणे गरजेचे असताना इथे एकही वनमजुर नाही. यामुळे आगीने जंगल नष्टं होत आहे. त्यामुळे  बेडगाव वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी किती गंभीरपणे याबाबत दुर्लक्ष करीत असल्याचे मत वनप्रेमी व्यक्त करीत आहेत.
     
आगीवर नियंत्रण ठेवता यावे यासाठी वनविभागाने यंत्र सामुग्री खरेदी केली.परंतु ही अनेक ठिकाणी वनविभागाच्या कार्यालयात, वनरक्षकच्या घरी धूळ खात पडली असतात. गेल्या दोन वर्षांपासून लाखो रुपये खर्च करून वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गडचिरोली जिल्ह्यातील वन सुरक्षित राहावे यासाठी प्रयत्न केले जात असले तरी वनपरिक्षेत्र अधिकारी याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे बोलल्या जात आहे.
     
मौल्यवान वनस्पती वनप्राणी नष्ट होत आहे. परंतु बेडगाव वनविभागाचे बरेच कर्मचारी अधिकारी हे मुख्यालययी न राहता ते देसाईंगज, ब्रमहपुरी, आरमोरी याठिकाणावरून महिणया काटी एक दोन दा आपल्या क्षेत्रात भेटी देऊन निघून जातात त्यामुळे या वन विभागात गेल्या दोन वर्षांपासून जंगलात मोठमोठया यंत्रा ने अतिक्रमणे मौल्यवान सागाचया झाडाची चोरीचे प्रकार अधिक प्रमाणात वाढलेले आहेत. या वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी हेच मुख्यालयराहत नाही. तर बिट वन रक्षक ला बिट सोडून गेल्या तीन वर्षांपासून वन विभागाच्या कार्यालयात बसून आपले काम करवून घेणे सुरू आहे. तर हा वन रक्षक वनपरिक्षेत्र अधिकाराच्या तोरा वन विभागात काम करीत आहे. तर दुसरीकडे  नवव्याने संपूर्ण जंगल झडून खाक होत आहे. आपल्या चुका झाकण्यासाठी वन विभागाच्या अधिकारी हे मोहफुल गोडा करणाऱ्या आदिवासी लोकांवर व ग्रामसभा वर खापर फोडले जात आहे. यावर्षी प्रत्येक वनरक्षक यांनी तीन महिने आपल्या कार्य क्षेत्रात मुख्यालय हजर राहण्याचे आवाहन ग्रामसभांनी केले आहे. तरी याकरीता वरिष्ठं अधिकारी लक्ष केंद्रित करून या गंभीर बाबीकडे लक्ष केंद्रित करावे, अशी मागणी जोर धरत आहे.

Web Title: marathi news gadchiroli forest fire forest department ignore