‘जीएमसी’मध्ये प्रतिजैवक औषधंच नाहीत; रुग्णांना आर्थिक फटका 

प्रवीण खेते 
गुरुवार, 11 जानेवारी 2018

अकोला - मागील काही दिवसात सर्दी, खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. अशातच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील खोकला व इतर प्रतिजैवक औषधांचा साठा संपल्याने रुग्णांना आर्थिक फटका बसत आहे. थंडीचे प्रमाण वाढले असून, विविध साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. त्यात सर्दी, खोकला अन् तापाच्या रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. खासगी दवाखाने किंवा रुग्णालयांमध्ये उपचार महागडा असल्याने बहुतांश रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात येतात. येथील रुग्णसंख्या वाढली असून, त्यामध्ये सर्दी, खोकल्याच्या रुग्णांची संख्या लक्षणीय आहे.

अकोला - मागील काही दिवसात सर्दी, खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. अशातच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील खोकला व इतर प्रतिजैवक औषधांचा साठा संपल्याने रुग्णांना आर्थिक फटका बसत आहे. थंडीचे प्रमाण वाढले असून, विविध साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. त्यात सर्दी, खोकला अन् तापाच्या रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. खासगी दवाखाने किंवा रुग्णालयांमध्ये उपचार महागडा असल्याने बहुतांश रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात येतात. येथील रुग्णसंख्या वाढली असून, त्यामध्ये सर्दी, खोकल्याच्या रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. मात्र, ऐन वेळी सर्वोपचार रुग्णालयातील ‘कफ-सिरफ’चा साठाच उपलब्ध नाही. 

याशिवाय, इतर प्रतिजैवक औषधांचा साठाही संपल्याची माहिती आहे. त्यामुळे गत दोन-तीन महिन्यांपासून येथे येणाऱ्या रुग्णांना खोकला व प्रतिजैवक औषध खासगी प्रतिष्ठानांमधून खरेदी करावी लागत आहेत. परिणामी सर्वसामान्य रुग्णांसाठी उपचार महागडा ठरत आहे. थकीत देयक पीएलएच्या माध्यमातून निल करण्यात येत आहेत. ही स्थिती लवकरच नियंत्रणात येईल. इतर सर्व औषधं सर्वोपारमध्ये उपलब्ध आहेत. खोकल्याची औषधं अपुरी पडत आहेत, असे अकोल्यातील शासकिय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी सांगितले.  

शस्त्रक्रिया साहित्यही नाही
औषध साठ्यासोबतच शस्त्रक्रिया विभागात लागणाऱ्या साहित्याची उपलब्धता देखील नसल्याची माहिती समोर आली आहे. अशा परिस्थितीत शस्त्रक्रीयेच्या रुग्णांवर उपचाराची डॉक्टरांना पंचाईत झाली आहे. शस्त्रक्रीयेसाठी लागणारे दस्ताने व इतर साहित्य जिल्हा सर्वोपचारमध्ये उपलब्ध नाहीत.

हापकीनची औषध खरेदी रखडली
शासकीय रुग्णालयांना औषध पुरवठ्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये, या उद्देशाने गत वर्षी हापककीनची औषध खरेदीसाठी मागणी करण्यात आली होती. परंतु, या प्रस्तावाची प्रक्रिया अर्ध्यातच रखडली. त्यामुळे हापकीनची औषध खरेदी रखडली आहे.

थकीत देयकाची स्थिती 
थकीत देयकांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी स्वीय प्रपंजी खात्यातून (पीएलए) निधी देण्याची मान्यता देण्यात आली आहे. परंतु, या खात्याची मर्यादा महिन्याची ४० लाख रुपये आहे. त्यामुळे गत काही महिन्यांपासून प्रलंबीत असलेले सहा लाखांच्या देयकांचा प्रश्न कायम आहे. 

 

Web Title: marathi news GMS akola medicines not available Patients finance