जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती डोंगरे एसीबीच्या जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 मार्च 2018

लाचलुचपत खात्याने जिपमध्ये लावलेल्या सापळ्यात गोंदिया जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती विश्वजीत डोंगरे यांना पकडले. 

गोंदिया - गोंदिया जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापती सह एकाला लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडल्याचे माहिती मिळाली आहे. 
लाचलुचपत खात्याने जिपमध्ये लावलेल्या सापळ्यात गोंदिया जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती विश्वजीत डोंगरे आणि त्यांच्या एका सहकाऱ्याला आपल्या कार्यालयाच एका इसमाकडून दीड लाख रुपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडल्याची माहीती समाेर आली आहे.

Web Title: marathi news gondia jilha parishad acb bribe police