विशेष मुलांनी तयार केल्या आकर्षक गुढी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 मार्च 2018

नागपूर - गुढीपाडव्यासाठी संध्या संवर्धन संस्थेतील विशेष विद्यार्थ्यांनी आकर्षक आकर्षक गुढींची निर्मिती केली आहे. या लक्षवेधी गुढींची बाजारपेठेत मागणी वाढली आहे.

नागपूर - गुढीपाडव्यासाठी संध्या संवर्धन संस्थेतील विशेष विद्यार्थ्यांनी आकर्षक आकर्षक गुढींची निर्मिती केली आहे. या लक्षवेधी गुढींची बाजारपेठेत मागणी वाढली आहे.

बुटीबोरी येथील संध्या संवर्धन संस्थेत ३३ विशेष मुले शिक्षण घेत आहेत. शिक्षणाबरोबरच कला कौशल्याची आवड निर्माण व्हावी यासाठी शाळेतर्फे विविध उपक्रम राबविण्यात येतात. गुढीपाडव्यासाठी मुलांनी पाने, फूल, काड्या आणि कापडाचा वापर करून छोट्या आकारातील शोभेच्या आकर्षक गुढी तयार केल्या आहेत. सुमारे साडेतीनशे शोभेच्या गुढींची विक्री गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येलाच झाल्याची माहिती उपक्रमाच्या संयोजिका माधुरी कांबे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

विशेष मुलांची कामातील रुची पाहून त्यांना उपक्रमातील कामे सोपविण्यात येतात. ज्या विद्यार्थ्यांना चित्रकलेची आवड आहे त्यांच्याकडून केवळ पानाफुलांची चित्रे काढून घेणे. इतर मुलांनाकडून कापडाची गुढी तयार करणे अशा स्वरूपात सहा महिन्यांपासून या उपक्रमाचे काम विद्यार्थ्यांनी पूर्ण केले. कुठल्याही प्रकारची जाहिरात अथवा मार्केटिंग न करता विशेष मुलांच्या शोभेच्या गुढीला बाजारात प्रत्येकी १५० रुपयांप्रमाणे मागणी आहे.

संस्थेत वर्षभर अशा प्रकारच्या विविध वस्तू तयार करण्याचे काम सुरू असते. विविध उपक्रमांत तयार केलेल्या वस्तूंच्या विक्रीतून मिळणारे उत्पन्न मुलांना दरमहा एक ते दीड हजार रुपये मानधन स्वरूपात देण्यात येते.
-आलोक त्रिवेदी, प्राचार्य, संध्या संवर्धन संस्था.

Web Title: marathi news gudi padwa nagpur news